अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विमानात पत्रकारांशी संवाद साधत असताना एका एनबीसी पत्रकाराला विमानातून बाहेर काढण्याची मागणी केली. ट्रम्प यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांबद्दल पत्रकाराने विचारताच ट्रम्प यांनी चिडून पत्रकाराचा मोबाईल फोन हिसकावून घेत त्याला विमानातून हाकलवून देण्याची मागणी केली.
२५ मार्च रोजी ट्रम्प हे टेक्सासमधील प्रचार रॅलीनंतर विमानात बसलेल्या पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी एनसीबीचे पत्रकार व्हॉन हिलयार्ड याने ट्रम्प हे त्यांच्या होत असलेल्या चौकशीमुळे त्रस्त असल्याचे म्हणाले. मात्र, त्रस्त नसल्याचे म्हणत आरोपांची बातमी ही खोटी असल्याचे ट्रम्प म्हणाले. यावर प्रश्न न विचारण्याचा इशाराही त्यांनी दिला. मात्र, हा विषय बंद न झाल्याने ट्रम्प यांनी रागात पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेत त्याला विमानाच्या बाहेर काढण्याच्या सूचना दिल्या.
हे ही वाचा:
संजय राऊत यांच्यापेक्षा शकुनी मामा बरा!
शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती
राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!
‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत
पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या आरोपात डोनाल्ड ट्रम्प दोषी असल्याचं सांगण्यात आलं होतं. जॉर्जियाच्या दक्षिणेकडील राज्यात ट्रम्प यांची निदर्शने, व्हाईट हाऊसमधून घेतलेल्या कागदपत्रांचा कथित गैरव्यवहार आणि त्यांच्या समर्थकांकडून यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यात त्यांचा सहभाग याची चौकशी केली जात आहे. यापूर्वीही अनेकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी वाद घातला आहे.