राज्य सरकारने प्रशासनात फेरबदल करण्यास सुरुवात केली असून मंगळवार, २ मे रोजी सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहा महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या असून तुकाराम मुंढें, मिलिंद म्हैसकर, डॉ. संजीव कुमार, जी श्रीकांत, पी शिवशंकर, डी टी वाघमारे, श्रवण हर्डीकर, डॉ. अभिजीत चौधरी, नितीन करीर, राधीक रस्तोगी या अधिकाऱ्यांची बदली झाली आहे.
कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी मिळाली?
- डॉ. नितीन करीर – अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
- मिलिंद म्हैसकर – अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग
- डी. टी. वाघमारे – गृहविभागाचे PS (A&S)
- राधिका रस्तोगी – प्रधान सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग
- डॉ. संजीव कुमार – मुख्य व्यवस्थापकीय संचालक, महापारेषण विभााग
- श्रावण हर्डीकर – अतिरिक्त आयुक्त, मुंबई महापालिका
- तुकाराम मुंढे – अतिरिक्त सचिव, कृषी आणि पशूसंवर्धन खाते
- जी. श्रीकांत – आयुक्त, छत्रपती संभाजीनगर महापालिका
- डॉ. अभिजित चौधरी – राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त
- पी. शिव शंकर – मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डी
हे ही वाचा:
‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत
शरद पवार म्हणतात, बाळासाहेबांसमवेतची सहजता उद्धव ठाकरेंशी बोलताना नव्हती
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या केरळमधील ‘वंदे भारत’ वर दगडफेक