राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवार, २ मे रोजी झाले. या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमादरम्यान शरद पवार यांनी त्यांच्या अनेक आठवणी सांगताना शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार हे आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केली आहे. यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येईल. ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहातील कार्यकर्ते नाराज झाले आहेत. यावेळी त्यांनी शरद पवारांना त्यांचा निर्णय मागे घेण्याची विनंती देखील केली. खासदारकीची तीन वर्षे शिल्लक असून त्या दरम्यान केंद्राच्या आणि राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष घालणार असल्याचे शरद पवारांनी सांगितले.
१९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन निवृत्ती घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे परीक्षक झोनफ्रिलोंचे अकाली निधन; अनेकांना धक्का
महात्मा गांधींचे नातू अरुण गांधी यांचे निधन
भिवंडीतून गायब झालेले बाळ सापडले झारखंडमध्ये
‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’
माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. परंतु, महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो, असं शरद पवार म्हणाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झाल्यानंतर पुण्यात काम केले. त्यानंतर मला मुंबईत काम करण्याची संधी मिळाली. तसेच इंदिरा गांधी यांच्यांशी संपर्क झाला. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्याचेही शरद पवार म्हणाले.
शरद पवारांचा निर्णय ऐकून कार्यकर्ते आणि नेते भावुक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.