पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा महिन्यांपूर्वी हैदराबादमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पसमांदा मुस्लिमांसाठी स्नेह यात्रेची घोषणा केली होती. पसमांदा मुस्लिमांच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचून त्यांना भाजपशी जोडण्यासाठी पुढाकार घेणे हा या यात्रेचा उद्देश होता. त्याचाच एक भाग म्हणजे आता ६५ मुस्लिमबहुल मतदारसंघात ३.२५ लाख ‘मोदी मित्र’ भाजपचा प्रचार करणार आहेत.
अश्रफ ते पसमंदापर्यंत म्हणजेच उच्चभ्रू ते दुर्बल वर्गापर्यंत पोहचण्यासाठी’ भाजप मुस्लिम मोर्चाची देशव्यापी मोहीम सुरु होत आहे. ही मोहीम १० मे पासून सुरू होत आहे. यासंदर्भात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी माहिती दिली आहे.
या समाजातील उच्च मानल्या जाणाऱ्या जातींपासून दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी आखलेल्या भाजप मुस्लिम मोर्चाच्या या देशव्यापी मोहिमेचा १० मेपासून प्रारंभ होत आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून ३ लाख २५ हजार मुस्लिम ‘मोदी मित्र’ देशभरातील ६५ मुस्लिमबहुल लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान मोदींसोबत केंद्राच्या मुस्लिम कल्याणकारी योजनांचा प्रचार करतील असे सिद्दीकी यांनी म्हटले आहे.
प्रचारासाठी देशातील मुस्लिमबहुल ६५ लोकसभा मतदारसंघांची निवड करण्यात आली आहे. या निवडलेल्या मतदारसंघांमध्ये ३०% पेक्षा जास्त मुस्लिम मतदार आहेत.यात उत्तर प्रदेश -बंगालमधील १३-१३, केरळमधील ८, आसाम ६, जम्मू-काश्मीर ५, बिहार ४, मध्य प्रदेश ३, तामिळनाडू. १-१ तर महाराष्ट्र, दिल्ली, गोवा, तेलंगणा, हरियाणा, लडाख आणि लक्षद्वीपमधील २-२ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील भिवंडी व छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.
भाजप सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मुस्लिमांना कोणताही भेदभाव न करता मिळत असल्याचे या अभियानांतर्गत सांगण्यात येणार असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले. एका लोकसभा मतदारसंघात ५ हजार मुस्लिम ‘मोदी मित्र’ असतील. यामध्ये प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर, वकील सारख्या बिगर राजकीय व्यक्तींचा समावेश असेल असे सिद्दीकी यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो
केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी
‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’
इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी सैन्याबरोबरच्या चकमकीत ठार
भाजपने या अभियानासाठी राष्ट्रीय पातळीवर एक पथक स्थापन केले असून एका पथकात २२ सदस्य असतील. लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात हे पथक मोदी व केंद्राच्या मुस्लिमविषयक कल्याणकारी योजनांच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे. एका विधानसभा मतदारसंघात किमान ७०० ‘मोदी मित्र’ असतील.