भारत- इस्रायल यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कंपनीने १०० मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्रे भारतीय सैन्य आणि हवाई दलाला दिली आहेत. ही मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहेत. ही मिडीयम-रेंज सर्फेस-टू-एअर-मिसाईल आहेत.
कल्याणी राफेल ॲडव्हान्स्ड सिस्टिम (केआरएएस) ही भारतातील कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टीम लि. आणि इस्रायलमधील राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स लि. यांची संयुक्त कंपनी आहे. त्यांनी हैदराबादमध्ये गाचीबोवली येथे तंत्रज्ञान, संशोधन आणि विकास, प्रारूप आणि अभियांत्रिकी या संदर्भातील एक संशोधन केंद्र देखील स्थापन केले आहे.
हे ही वाचा:
उरातला साधेपणा हे मनोहर पर्रिकरांचे वैशिष्ट्य होते- अतुल भातखळकर
सचिन वाझेंनी वापरलेला शर्ट एनआयएच्या ताब्यात
उत्तराखंडमध्ये रेल्वे अचानक उलट धावली
हे मिसाईल यानंतर भारत डायनामिक्स या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला भविष्यातील एकात्मिकरणासाठी देण्यात येणार आहे.
राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेडच्या एअर ॲंड मिसाईल डिफेन्स विभागाचे मुख्य ब्रिगेडियर जनरल पिन्हास यंगमॅन यांनी केआरएएस भारताच्या संरक्षणासाठी केवळ वस्तूंचे उत्पादन करणार नाही, तर भारत सरकारच्या निर्यातीचे लक्ष्य गाठण्यास देखील मदत करेल.
याबाबत केआरएएसचे मुख्य रुद्र बी जडेजा यांनी देखील समाधान व्यक्त केले. ते म्हणाले की हा भारतीय लघु-मध्यम आकाराच्या उद्योगाचा फक्त मेक इन इंडियाच नव्हे तर आत्मनिर्भरतेकडच्या प्रवासाचा प्रारंभ आहे. यासाठी कंपनीने राफेल ॲडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेडच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत कल्याणी ग्रुपच्या अभियांत्रिकी कौशल्याची सांगड घातली आहे.
कल्याणी समुहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी यांनी संरक्षणाच्या बाबतीतील आत्मनिर्भरतेची ही सुरूवात असल्याचे देखील म्हटले आहे. आत्मविश्वास, अत्याधुनिक तंत्रज्ञान यांच्या सहाय्याने भारत संरक्षण उत्पादनातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र होऊ शकतो असे देखील ते म्हणाल आहेत.