25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाभिवंडीतील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मुलांची आईसाठी आर्त हाक

भिवंडीतील इमारत दुर्घटनेत बचावलेल्या मुलांची आईसाठी आर्त हाक

Google News Follow

Related

‘आमची आई कुठे आहे?’… पाच आणि सात वर्षांच्या दोन भावंडांचा आर्त आवाज रुग्णालयातील प्रत्येकाचेच हृदय पिळवटून टाकत होता. परंतु त्यांचे वडील रवी महतो (३२) सांत्वन करण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. प्रेमराज महतो उर्फ चिकू (७) आणि प्रिन्स कुमार (५) यांची आई ललिता (२५) आता त्यांना कधीच मायेने जवळ घेऊ शकणार नव्हती. भिवंडी येथे इमारत कोसळून झालेल्या अपघातात त्यांची आई त्यांना पोरके करून गेली होती. ‘मल कळत नव्हते, की मी त्यांना काय सांगू? ते खूपच लहान आहेत आणि मी जेव्हा त्यांना सांगेन तेव्हा ते कसे वागतील, हे मला खरेच माहीत नाही,’ त्यांचे वडील सांगत असतात.

जेव्हा हा अपघात घडला, तेव्हा ही दोन्ही भावंडे घरात टीव्ही बघत होती आणि रोजची कामे आटोपल्यानंतर त्यांची आई आंघोळीला गेली होती. हे कुटुंब इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहात होते. इमारत कोसळल्यानंतर सुमारे तीन तासांनंतर म्हणजेच दुपारी साडेतीन वाजता चिकू आणि प्रिन्स यांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून बचाव पथक त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले. त्यांच्या आईलाही त्यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता बाहेर काढले. मात्र तिचा मृत्यू झाला होता.

या अपघातातील दुसरे बळी, नवनाथ सावंत (४३) ठरले. ते या इमारतीमध्ये त्यांच्या सहकाऱ्यासोबत डिलिव्हरीसाठी आले होते. हा सहकारी या अपघातातून बचावला. मात्र इमारतीबाहेर पडण्यात अवघ्या काही सेकंदांचा उशीर झाल्याने सावंत यांना मृत्यूने गाठले आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. सावंत हे मूळ बीड गावचे होते आणि ते गेल्या सहा वर्षांपासून एका गोदामात डिलिव्हरीचे काम करत होते. ते भिवंडीतील फुले नगर भागात पत्नी, दोन मुले आणि पालकांसह राहतात. त्यांचे सहकारी सांगतात, ‘माझ्यासमोर मी माझा सहकारी, मित्र गमावला आणि मी काहीच करू शकलो नाही, हे मी कधीच विसरू शकणार नाही.’

हे ही वाचा:

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

मुंबई मेट्रोतून करा २५ टक्के सवलतीच्या दरात प्रवास

 

पहिल्या मजल्यावर काम करणारे उदयभान यादव (४०) आणि विकास राजभर (२०) हे दोघे कामगार सुदैवी ठरले. ते एका मोठ्या कंटेनरमध्ये सामान ठेवण्याचं काम करत होते. त्याच्या खालीच त्यांनी आसरा घेतला. त्यामुळे ते बचावले. त्यानंतर ढिगारा हटवताना ते सापडले. त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याच इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या सोनाली कांबळे (२१) आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा शिवकुमारही बचावले. ‘आम्ही खरोखरच सुदैवी ठरलो. तिसरा मजला आमच्यावर कोसळला. पण आम्ही कसंबसं वरच्या मजल्यावर पोहोचलो आणि आमच्यावरचं ढिगारा हटवून बाहेर पडण्यात सफल झालो,’ असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा