24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

मन की बात.. हा माझ्यासाठी श्रद्धा, उपासना, अहम ते वयमचा प्रवास!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील लाखो नागरिकांशी १०० व्या भागात साधला संवाद

Google News Follow

Related

रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासूनच लोक रेडिओ, मोबाईल आणि टीव्ही समोर येऊन जमले होते. कधी अकरा वाजतात आणि ‘मन की बातचा १०० वा भाग सुरु होतो याची देशातच नाही तर विदेशातील प्रत्येकालाच उत्कंठा लागून राहिली होती. अकरा वाजले आणि पंतप्रधानांचे शब्द कानावर पडले. ‘मन की बात’च्या सुरुवातीलाच पंतप्रधानांनी १०० व्या भागासाठी सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, आज ‘मन की बातचा १०० वा भाग आहे. मला तुम्हा सर्वांची हजारो पत्रे आणि संदेश आले आहेत. शक्य तितक्या पत्रातील गोष्टी वाचण्याचा आणि पाहण्याचा प्रयत्न केला. संदेश समजून घेण्याचा प्रयत्न करा. पत्र वाचताना अनेकवेळा भावूक झालो, भावनेत वाहून गेलो आणि स्वत:ला सांभाळले १०० व्या भागासाठी तुम्ही सर्वानी अभिनंदन केले पण खरे सांगतो तुम्ही सर्व श्रोते पात्र आहात. तुम्ही सर्व देशभरातील श्रोते आहात. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी विजयादशमीच्या दिवशी आम्ही सर्वांनी मिळून ‘मन की बातचा प्रवास सुरू केला. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे पर्व.

 

‘मन की बात देखील दर महिन्याला येणारे पर्व बनले. ज्यामध्ये आपण सकारात्मकता आणि त्यात लोकांचा सहभाग साजरा करतो. या कार्यक्रमाला इतकी वर्षे झाली यावर विश्वास बसत नाही. प्रत्येक एपिसोड नवीन आहे. देशवासीयांचे नव्या यशाचा मागोवा यात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून सर्व वयोगटातील लोक यामध्ये सहभागी झाले. दर महिन्याला मी देशवासीयांच्या त्यागाच्या पराकाष्ठतेचा अनुभव घेतो. या कार्यक्रमामुळे मी तुमच्या सर्वांपासून थोडंही दूर आहे असं मला वाटत नाही.

‘मन की बात हा कार्यक्रम नसून माझ्यासाठी श्रद्धा, उपासना आणि उपवास आहे. लोक देवपूजेला जाताना प्रसादाचे ताट घेऊन येतात. भगवंताच्या रूपातील जनता म्हणजे जनार्दनच्या चरणी प्रसादाचे ताट आहे. माझ्यासाठी हा एक आध्यात्मिक प्रवास झाला आहे. हा अहम ते वयम असा प्रवास आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हे ही वाचा:

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

दंतेवाड्यात दोन महिने आधीच पेरण्यात आली होती स्फोटके !

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या  

‘मन की बात मध्ये उल्लेख केलेले हरे हिरो

 

‘मन की बात म्हणजे स्वयं नाही तर तुम्ही असा हा संस्कार असल्याचे मी मानतो. कल्पना करा की एक देशवासी ४०-४०वर्षांपासून निर्जन जमिनीवर झाडे लावत आहे. कोणीतरी ३० वर्षांपासून जलसंधारणासाठी विहीर बांधत आहे. कोणी गरीब मुलांना शिकवत आहे. कुणी गरिबांच्या उपचारात मदत करत आहे. ‘मन की बात’ मध्ये त्यांचा उल्लेख करताना अनेकदा मी भावूक झालो. ‘मन की बात’ मध्ये आपण ज्या लोकांचा उल्लेख करतो ते सर्व आपले हिरो असून त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम जिवंत आहे. आज आपण १००व्या भागाचा टप्पा गाठला आहे, तेव्हा मला पुन्हा एकदा या हिरोंना भेटण्याची आणि त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

 

गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत केले श्रावण

मोदींच्या ‘मन की बात कार्यक्रमाचे मुंबईत  खास आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी देखील उपस्थित होते. विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघात हा कार्यक्रम झाला. मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभेतील ५ हजारांहून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा