25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामादोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

दोन महिलांच्या भांडणानंतर गोळीबार, एका महिलेने गमावला जीव

हल्लेखोर हे सराईत गुंड असून त्यांच्यावर पूर्व उपनगरात अनेक गुन्हे दाखल

Google News Follow

Related

मानखुर्द मंडाला येथे एका चाळीत दोन महिलांच्या भांडणात एकीच्या पतीने आणि मुलाने दुसऱ्या महिलेवर गोळीबार करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारी रात्री घडली आहे.

या गोळीबाराच्या घटनेमुळे मंडाला परिसर हादरला असून स्थानिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

फरजाना इरफान शेख (३१) असे गोळीबारात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. फरजाना ही मानखुर्द मंडाला इंदिरा नगर परिसरात राहण्यास होती. त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेसोबत शनिवारी सायंकाळी फरजानाचे कडाक्याचे भांडण झाले, दोन महिलांच्या भांडणात एका महिलेच्या नवरा पोट्या आणि आणि मुलगा सोनू सिंह यांनी फरजानाला मारहाण करून सोनू सिंह याने पिस्तुल मधून फरजानावर दोन गोळ्या झाडल्या व तेथून पळ काढला. या गोळीबारात फरजाना ही गंभीर जखमी झाली तिला उपचारासाठी राजवाडी रुग्णालयात आणण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.

हे ही वाचा:

गाढवाशी वाद, अर्थात मालवणी वस्त्रहरण

शंभरीतली ‘मन की बात’आणि मोदींना दिलेल्या ९१ शिव्या

शिवरायांचा रायगडावर होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

१०० कोटी लोकांनी एकदा तरी केले ‘मन की बात’ चे श्रवण

मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीची ओळख पटविण्यात आलेली या दोन्ही आरोपीच्या मागावर पोलीस पथक असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल अशी माहिती परिमंडळ ६चे पोलीस उपायुक्त हेमसिंग राजपूत यांनी दिली.

फरजाना आणि दुसऱ्या महिलेसोबत झालेल्या भांडणाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते अशी माहिती स्थानिक सूत्राकडून समोर येत आहे. हल्लेखोर हे सराईत गुंड असून त्यांच्यावर पूर्व उपनगरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या गोळीबाराच्या घटनेनंतर मानखुर्द परिसर हादरला असून स्थानिकामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा