23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनियाभारतीयांच्या सुटकेसाठी सुदानच्या उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीवर उतरले विमान

भारतीयांच्या सुटकेसाठी सुदानच्या उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीवर उतरले विमान

भारतीय हवाई दलाच्या धाडसी वैमानिकांनी हरक्युलस विमान अंधाऱ्या रात्री उतरवले

Google News Follow

Related

युद्धग्रस्त अडकलेल्या सुदानमधून आतापर्यंत सुमारे २४०० भारतीयांची सुटका करण्यात यश आले आहे. ‘ऑपरेशन कावेरी’ अंतर्गत भारतीयांचा १३ वा गट सुदानवरून सौदीमधील जेद्दा शहरासाठी रवाना झाला आहे. यामध्ये ३०० प्रवाशांचा समावेश आहे. विदेशी मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्वीट करून आतापर्यंत २४०० भारतीयांची सुदानमधून सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती दिली. भारतीयांना घेऊन आयएनएस सुमेधा जहाज सूदानमधून निघाल्याचे त्यांनी सांगितले.

अंधारात, उद्ध्वस्त धावपट्टीवर विमान उतरवले

भारतीय हवाई दलाच्या धाडसी वैमानिकांनी हरक्युलस विमान अंधाऱ्या रात्री एका उद्ध्वस्त झालेल्या धावपट्टीवर उतरवले आणि तेथील एका गर्भवती महिलेसह शेकडो भारतीयांची सुखरूप सुटका केली. भारतीय हवाई दलाने शुक्रवारी एक निवेदन जाहीर केले. त्यात त्यांनी या अभियानासंदर्भात माहिती दिली. २७ एप्रिलच्या मध्यरात्री हवाई दलाच्या वैमानिकांनी सी १३० जे विमान खार्तूमपासून ४० किमी दूर असलेल्या वाडी सैयदना येथील लष्कराच्या विमानतळावर उतरवले.

विमानतळाच्या धावपट्टीवर मार्गदर्शक चिन्हांची (नेव्हिगेटरची) कोणतीही सुविधा नव्हती तसेच, धावपट्टीवर उतरण्यासाठी पुरेशी प्रकाशव्यवस्थाही नव्हती. विमानात इंधन भरण्याचीही सोय नव्हती. या खडतर परिस्थितीमध्ये हवाई दलाच्या वैमानिकांनी नाइट व्हिजन गॉगलचा वापर केला. धावपट्टीच्या जवळ आल्यावर वैमानिकांनी इन्फ्रा रेड सेन्सरचा उपयोग करून धावपट्टीवर काही अडथळा किंवा धोका नाही ना, याची खात्री करून घेतली आणि विमान उतरवले.

नौदलाच्या ज्या जहाजातून सुदानमधील भारतीयांना सौदी अरबमधील जेद्दा बंदरावर नेले जाणार होते, त्या सुदानच्या वाडी सैयदना येथील बंदरावर पोहोचण्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही साधन नव्हते. येथे येणाऱ्या ताफ्याचे नेतृत्व भारताच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अधिकारी करत होते. ते धावपट्टीवर पोहोचेपर्यंत हवाईदलाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात होते. विमानाचे इंजिन सुरू ठेवले.

हे ही वाचा:

…तर बृजभूषण सिंह राजीनामा देण्यास तयार

युक्रेनच्या अनेक शहरांवरील क्षेपणास्त्र हल्ल्यांत २५ जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले

महाराष्ट्रातील १९ नागरिक सुदानमधून सुखरूप परतले

विमान धावपट्टीवर उतरल्यावरही वैमानिकांनी इंजिन सुरूच ठेवले होते. हवाई दलाच्या आठ कमांडोंनी खाली उतरल्यावर मोहिमेची जबाबदारी हाती घेऊन भारतीयांना विमानात चढायला तसेच त्यांचे सामान सुरक्षित ठेवण्यात मदत केली. तसेच, नाइट व्हिजन गॉगलच्या मदतीने विमानाने उड्डाणही केले.

इतिहासात मोहिमेची नोंद

वाडी सैयदना आणि जेद्दा दरम्यानची सुमारे अडीच तासांची ही मोहीम भारतीय नौदलाच्या इतिहासात त्यांनी केलेल्या असीम साहसासाठी ओळखली जाईल. या मोहिमेसाठी नौदलाचे आयएनएस सुमेधा, तेग, तरकश ही जहाजे आणि हवाई दलाच्या सी-१३० या विमानांची मदत घेण्यात आली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा