25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाआंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

पोलिसांनी केली पित्याला अटक, मायलेकी रुग्णालयात दाखल

Google News Follow

Related

मुलगी जातीच्या बाहेर लग्न करीत असल्याचा रागातून ७९ वर्षीय पित्याने साखरपुड्याच्या रात्रीच मुलगी आणि पत्नीवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना वर्सोवा सात बंगला येथे गुरुवारी पहाटे घडली.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मायलेकींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली असून पित्याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रणिता शेट्टी (३८) आणि गीता शेट्टी (६८) असे हल्ल्यात जखमी झालेल्या माय लेकीचे नावे आहे. वर्सोवा सातबंगला येथील एका इमारतीत राहणाऱ्या प्रभाकर शेट्टी आणि गीता शेट्टी या दाम्पत्याना प्रणिता आणि प्रचिथ ही दोन मुले आहेत. प्रचिथ हा परदेशात नोकरी करतो तर प्रणिता ही एका खाजगी कंपनीत नोकरीला आहे.

प्रणिता हिचे दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत प्रेमप्रकरण सुरू असून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र प्रणिताचे पिता प्रभाकर यांना आंतरजातीय विवाह मान्य नव्हता, आईची मात्र लग्नाला संमती होती. बुधवारी प्रणिता आणि प्रियकर निखिल यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम मालाड येथील साई पॅलेसमध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची पत्रिका छापण्यात आणि होती, परंतु पत्रिकेवर प्रणिताचे वडील प्रभाकर यांचे नाव छापण्यात आले नव्हते.

बुधवारी दुपारी प्रणिता ही आई सोबत साखरपुड्याला गेली होती आणि रात्री उशिरा घरी आल्या. दिवसभर दगदग झाल्यामुळे दोघीही दमल्या होत्या, घरी येताच दोघी झोपी गेल्या. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्रभाकर याने गाढ झोपेत असलेल्या पत्नी गीता हिच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून दोरीने गळा आवळून हत्या करण्याचा प्रयत्न केला, आईचा आरडाओरड एकूण प्रणिता ही आई वडिलांच्या खोलीत आली व पित्याच्या तावडीतून आईची सुटका करू करीत असताना प्रभाकर याने मुलगी प्रणितावर चाकूने हल्ला केला.

हे ही वाचा:

देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

प्रोबेशनरी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

मायलेकींचा आरडाओरडा एकूण शेजाऱ्यांनी शेट्टीच्या घराकडे धाव घेऊन पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या वर्सोवा पोलिसानी प्रभाकर याला ताब्यात घेऊन जखमी मायलेकीला उपचारासाठी कोकिळा बेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी प्रभाकर शेट्टी यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा