24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषमुंबई क्रिकेट क्लब, अवर्स यांच्यात अंतिम झुंज

मुंबई क्रिकेट क्लब, अवर्स यांच्यात अंतिम झुंज

पहिली राजसिंग डुंगरपूर चषक १५ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा

Google News Follow

Related

सी.सी.आय. आयोजित पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत मुंबई क्रिकेट क्लब आणि अवर्स क्रिकेट अकादमी यांच्यात उद्या (शुक्रवारी) अंतिम झुंज रंगणार आहे. गुरुवारी झालेल्या शेवटच्या साखळी लढतीत मुंबई क्रिकेट क्लब संघाने साळगावकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध तब्बल ११२ धावांनी विजय मिळवत “अ” गटात अपराजित राहून अव्वल क्रमांक पटकावला. त्यामुळे उद्या “बी” गटात सरस कोशंटमुळे अव्वल ठरलेल्या अवर्स क्रिकेट अकादमी विरुद्ध त्यांची निर्णायक लढत होईल.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई क्रिकेट क्लब संघाने २० षटकांत ३ बाद १७३ धावांचे लक्ष्य उभारले. स्वनिक वाघदरे (६९) आणि धैर्यशील देशमुख (नाबाद ४७) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची भागीदारी रचून ही करामत केली. स्वनिक याने केवळ ३६ चेंडूत १० चौकार आणि एका षट्काराच्या साहाय्याने ६९ धावा फाटकावल्या. आरव ठक्कर याने २७ धावा करून त्यात खारीचा वाटा उचलला.

या आव्हानाचा पाठलाग करताना साळगावकर स्पोर्ट्स क्लब संघ कधीही हे आव्हान पार करू शकेल असे वाटत नव्हते. विहान केसवानी १२, आरुष चड्ढा २४, आणि तनय नगरकर १० यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांनी साफ निराशा केली आणि २० षटकांत त्यांना केवळ ८ बाद ६१ एवढीच मजल मारता आली. साद खान याने टिच्चून गोलंदाजी करीत ९ धावांत ३ बळी मिळविले.  सामनावीर म्हणून स्वनिक वाघदरे याची निवड करण्यात आली आणि सी.सी.आय.चे मानव संसाधन विभागाचे प्रमुख अधिकारी जयकिशन कुमठेकर यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले.

हे ही वाचा:

देशभरात १५७ नवीन नर्सिंग महाविद्यालये होणार सुरू

‘राहुल गांधी पवारांविरोधात ट्वीट करण्याची हिंमत दाखवतील काय?’

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

भारतीयांनी अनुभवला सुदानमधील सुडाचा प्रवास

संक्षिप्त धावफलक :  मुंबई क्रिकेट क्लब – २० षटकांत ३ बाद १७३ (आरव ठक्कर २७, स्वनिक वाघदरे ६९, धैर्यशील देशमुख नाबाद ४७) वि.वि. साळगावकर स्पोर्ट्स क्लब – २० षटकांत ८ बाद ६१ (विहान केसवानी १२, आरुष चड्ढा २४, तनय नगरकर १०; साद खान ९/३). सामनावीर – स्वनिक वाघदरे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा