23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामादंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ११ जवान शहीद

दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात ११ जवान शहीद

जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर आयईडी हल्ला

Google News Follow

Related

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यामध्ये ११ जवान शहीद झाले आहेत. दंतेवाडा येथील अरणपूर येथे जिल्हा राखीव रक्षक दलाच्या वाहनावर करण्यात आलेल्या आयईडी हल्ला झाला. शहीद जवानांमध्ये १०जिल्हा राखीव रक्षक दलाचे जवान आणि एका चालकाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यानंतर पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरले आहे. दोघांमधील चकमक अजूनही सुरूच आहे. त्यामुळे सैन्याची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे.

नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.हे जवान गस्त घालून परतत होते. गस्तीवर येतांना हे जवान पायी जात होते. परतताना थकवा आल्याने पिकअप वाहनात लिफ्ट घेऊन ते परत कॅम्पकडे येत होते. त्याचवेळी अरणपूर कुवकोंडा दरम्यान जवानांनी भरलेल्या वाहनात नक्षलवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. या भयंकर आयडी स्फोटानंतर रस्त्यामध्ये मोठ्ठा खड्डा पडला. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस बंदोबस्त परिसरात रवाना करण्यात आला आहे.

जवानांचे मृतांचे मृतदेह घटनास्थळावरून काढले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी तेथे उपस्थित असून शोध मोहीम हाती घेण्यात आली असल्याचे नक्षलवादी हल्ल्यानंतर बस्तरचे पोलीस महासंचालक पी सुंदरराज यांनी माहिती देतांना सांगितले.
ही घटना अत्यंत दुःखद आहे. शोकग्रस्त कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नक्षलवाद्यांना सोडले जाणार नाही. नियोजनबद्ध पद्धतीने नक्षलवाद उखडला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

सुरक्षा दलाकडून अलीकडच्या काळात नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याचवेळी नक्षलवाद्यांकडूनही सातत्याने हल्ले केले जात आहेत. गेल्या महिन्यात माओवाद्यांनी पेरलेल्या प्रेशर आयईडीच्या धडकेने विजापूरमध्ये एका जवानांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान याआधी ९ मार्च रोजी छत्तीसगडमधील सुकमा येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि बॅरल ग्रेनेड लाँचर जप्त करण्यात आले. या चकमकीत ५ ते ६ नक्षलवादी जखमी झाल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. ही चकमक सुकमाच्या सकलेर भागात झाली. कोब्रा बटालियन आणि एसटीएफच्या संयुक्त पथकासोबत नक्षलवाद्यांची चकमक झाली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा