23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषपुलेल्ला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमींची हॅट्ट्रिक

पुलेल्ला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमींची हॅट्ट्रिक

हैदराबादमध्ये आता ६ कोर्ट्सची नवी अकादमी राहिली उभी

Google News Follow

Related

भारताचे प्रख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक आणि ऑल इंग्लंडचे माजी विजेते पुलेला गोपीचंद यांनी तिसऱ्या बॅडमिंटन अकादमीची सुरुवात केली आहे.

याआधी निम्मगडा पुलेला गोपीचंद अकादमी ही पहिली अकादमी हैदराबाद येथे उघडण्यात आली होती. २००७मध्ये तिचे उद्घाटन झाले होते. त्यापासून एक किलोमीटर अंतरावर दुसरी अकादमी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून उघडली गेली. त्यात ९ कोर्टचा समावेश आहे. तिथेच ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणाऱ्या पी. व्ही. सिंधूने आपला सराव केला. त्यानंतर आता ही तिसरी अकादमी उभी राहिली आहे.

 

पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशनने आज गचीबोवली, तेलंगणा येथे जागतिक दर्जाचे बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्र ‘कोटक पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी’च्‍या लॉन्‍चची घोषणा केली. या लॉन्‍चप्रसंगी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशनचे संस्‍थापकीय विश्‍वस्‍त व भारताचे राष्‍ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, किदाम्बी श्रीकांत, एच.एस. प्रणय, साई प्रणित, विश्‍वस्‍त एल. व्‍ही. सुब्रमण्‍यम, महिंद्रा बँकेच्‍या पूर्ण-वेळ संचालक शांती एकमबरम आणि ग्रुपचे अध्‍यक्ष व ग्रुपचे चीफ फायनान्शियल ऑफिसर जयमिन भट उपस्थित होते.

 

सायना नेहवाल यावेळी म्हणाली की, माझे वडील आणि आई हेदेखील बॅडमिंटन खेळत पण मला तो खेळ खेळायला आवडत नसे. मात्र माझ्या वडिलांच्या मित्राने मला तो खेळ खेळण्यासाठी पाठवायला सांगितले. त्यामुळे मी बॅडमिंटनकडे वळले. पण मला अभिमान वाटतो की, गोपीचंद हे माझे प्रशिक्षक होते.

 

गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटे ४.३० पासून सरावाला सुरुवात करणाऱ्यांपैकी किदाम्बी श्रीकांतही होता. तो म्हणाले की, लहान असताना मी सायनाला ऑलिम्पिक उपांत्यपूर्व फेरीत खेळताना पाहिले होते पण मी त्याच अकादमीत खेळू शकलो याबद्दल मी गोपीचंद सरांचा आभारी आहे. मी खरा तर दुहेरीचा खेळाडू होतो पण त्यांनी मला एकेरी खेळण्याचा सल्ला दिला.

हे ही वाचा:

आता ‘वॉटर मेट्रो’ने घ्या केरळच्या बॅक वॉटरचा आनंद

पंतप्रधानांना आत्मघाती बॉम्ब हल्ल्याचे धमकी पत्र लिहिणारा  पोलिसांच्या जाळ्यात

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी बसला पहाटे भीषण अपघात, ४ जणांचा जागीच मृत्यू

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्री पदाची दावेदारी…

नवीन लॉन्‍च करण्‍यात आलेले अत्याधुनिक बॅडमिंटन केंद्र केएमबीएलच्या क्रीडाविषयक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) प्रकल्पाचा भाग आहे आणि बँक व बॅडमिंटनच्या क्षेत्रात भारताला अधिक नावलौकिक मिळवून देणाऱ्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाउंडेशनचे संस्‍थापकीय विश्‍वस्‍त ज पुलेला गोपीचंद यांच्या दृष्टिकोनातून विकसित करण्‍यात आले आहे.

 

२०१९ मध्‍ये कोटक महिंद्रा बँकेने भारतीय बॅडमिंटन खेळाडूंकरिता जागतिक दर्जाची प्रशिक्षण सुविधा विकसित करण्‍यासाठी पुलेला गोपीचंद बॅडमिंटन फाऊंडेशन (फाऊंडेशन) सोबत सहयोगाने क्रीडामधील त्‍यांच्‍या सीएसआर प्रकल्‍पाची घोषणा केली. या नवीन प्रशिक्षण सुविधेचे लॉन्‍च दोन्‍ही संस्‍थांसाठी लक्षणीय टप्‍पा आहे.

 

कोटक महिंद्रा बँकेच्‍या पूर्ण-वेळ संचालक शांती एकमबरम म्‍हणाल्‍या, ‘‘कोटक महिंद्रा बँक आणि पुलेला गोपीचंद यांचा भारतातील जागतिक दर्जाच्‍या बॅडमिंटन खेळाडूंना निपुण करण्‍याचा आणि देशाच्‍या भावी तरूणांसाठी क्रीडा पायाभूत सुविधा व मार्ग प्रबळ करण्‍याचा समान दृष्टिकोन आहे.

 

पुलेला गोपीचंद म्‍हणाले, ‘‘सध्‍याच्‍या बॅडमिंटन प्रशिक्षण सुविधेचा जागतिक चॅम्पियन्‍स निर्माण करण्‍याचा वारसा आहे, ज्‍यांनी ऑलिम्पिक्‍सपासून राष्ट्रकुल स्पर्धेपर्यंत प्रमुख स्पर्धांमध्ये भारताचे नावलौकिक केले आहे. १५ वर्षांपूर्वी सुरू झाल्‍यापासून अकादमीच्या माध्यमातून देशाच्या विविध भागातून आलेल्या गुणवान मुलांना मंच उपलब्ध करून देत आहे.

 

कोटक-पुलेला गोपीचंद बॅडमिंटन प्रशिक्षण केंद्रामध्‍ये प्रदान करण्‍यात आलेल्‍या सुविधा:

  • उच्‍च-कार्यक्षम प्रशिक्षण केंद्रामध्‍ये सहा वातानुकूलित बॅडमिंटन कोर्ट.
  • खेळाडूंच्‍या सर्वांगीण विकासासाठी नियुक्‍त करण्‍यात आलेले अव्‍वल दर्जाचे निवासी न्‍यूट्रिशनिस्‍ट्स, फिजियोथेरपीस्‍ट्स व स्‍ट्रेन्‍थ अॅण्‍ड कंडिशनिंग एक्‍स्‍पर्ट्स असलेले स्‍पोर्ट्स सायन्‍स सेंटर.
  • जागतिक दर्जानुसार उच्‍च दर्जाच्‍या प्रशिक्षण व कोचिंग सुविधा.
  • अकॅडमीच्‍या आत व बाहेर मोठी कामगिरी करण्‍याची क्षमता असलेले आर्थिकदृष्‍ट्या वंचित प्रशिक्षक व खेळाडूंसाठी फेलोशिप प्रोग्राम्‍स.
  • भारतभर बॅडमिंटन प्रशिक्षणाची पोहोच वाढवण्यासाठी जुन्या खेळाडूंसाठी कोच सर्टिफिकेशन प्रोग्राम.

या सहयोगामधून दोन्‍ही संस्‍थांची भारतीय बॅडमिंटनची वाढ व विकासासाठी योगदान देण्‍याप्रती कटिबद्धता दिसून येते.

कोटक कर्मा ही कोटक महिंद्रा ग्रुप ऑफ कंपनीजची कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) ओळख आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा