30 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामाशिक्षा भोगलेल्या कैद्यांची म्हणून घडविली कच्च्याबच्च्यांशी गळाभेट

शिक्षा भोगलेल्या कैद्यांची म्हणून घडविली कच्च्याबच्च्यांशी गळाभेट

या कार्यालयाकडून सूचना पत्र व परिपत्रक निर्गमित करून कार्यवाही केली जात होती.

Google News Follow

Related

कारागृहातील शिक्षा बंद्यांची शिक्षा भोगून पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी आणि समाजाने त्यांना स्वीकृत करून समानतेची वागणूक मिळावी आणि बंद्यांना आपल्या कुटुंबाबद्दल सहानुभूती व आपुलकी निर्माण होण्याच्या दृष्टीने बंदी आणि त्यांची १६ वर्षाखालील मुले यांची समक्ष भेट घडवून आणणे आवश्यक आहे. जेणेकरून समक्ष भेटीत बंदी व त्यांची मुले यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याने शिक्षणाबाबत व घरगुती अडचणी सोडवण्यास मदत होऊ शकेल यास्तव कारागृहात शिक्षाधीन पुरुष व महिला बंदी व न्यायाधीन महिला बंद्यांची कारागृहाबाहेरील सोळा वर्षाखालील मुलांची समक्ष भेट देण्यात येत होती.

या कार्यालयाकडून सूचना पत्र व परिपत्रक निर्गमित करून कार्यवाही केली जात होती.

कारागृहातील बंद्यांचे नैराश्य कमी होण्याकरिता व कौटुंबिक परिस्थितीबाबत जाणीव होण्याच्या दृष्टीने तसेच बंदी व नातेवाईक यांच्यामधील सुसंवाद सुलभ व्हावा त्यांच्या समक्ष भेटी सुलभ व्हाव्यात  व कारागृह विभागाचे ” सुधारणा व पुनर्वसन ” या ब्रीद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने कारागृहातील बंद्यांच्या कारागृहाबाहेरील असलेल्या मुले, नातू व भाऊ-बहीण यांना प्रत्यक्ष समक्ष भेटी देण्याबाबत नव्याने समावेश करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

ट्विटरची ब्ल्यू टिक हरवली, आम्हाला नाही मिळाली!

चित्ता’कर्षक नावे; एल्टन झाला गौरव तर ओबानला नाव मिळाले पवन !

मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणार सर्वोच्च न्यायालयात

पाठीच्या कण्याच्या मदतीने त्याने खेचले तब्बल १,२९४ किलो वजनाचे वाहन

यामुळे बंद्यांच्या नात-नातू यांच्या शिक्षणाबाबत व कौटुंबिक अडचणी सोडवण्यास मदत होईल. मुले, नात-नातू, भाऊ-बहीण यांची समक्ष भेट तसेच रक्ताच्या नातेवाईकांचा होणारा मायाळू स्पर्श होऊन बंद्यास जगण्याची नवी उमेद निर्माण होईल व नात -नातू, भाऊ-बहीण, मुले यांनाही बंद्यांविषयी कृतज्ञता वाटून नवीन ऊर्जा मिळेल व कारागृह प्रशासनाविषयी आपुलकीची भावना वाढीस लागेल. याबाबत कार्यवाहीकरिता राज्यातील सर्व कारागृह अधीक्षकांना आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.त्यामुळे कारागृहातील बंदी व नातेवाईक यांचेमध्ये निश्चितच समाधानाचे व आपुलकीचे वातावरण निर्माण होईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा