जगातील सर्वात उंच पुतळा असा विश्वविक्रम नोंदवलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात मधील पुतळा हा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. आजवर या पुतळ्याला ५० लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. पुतळ्याचे अनावरण झाल्यापासून केवळ ५५३ कामकाजाच्या दिवसात स्टॅच्यू ऑफ युनिटीने हा ५० लाख पर्यटकांचा पार केला आहे.
गुजरातमधील केवडीया येथे उभारला गेलेला, ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखला जाणारा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. २०१० साली नरेंद्र मोदी गुजराथचे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली असून २०१३ साली याच्या बांधकामाला सुरुवात झाली. या पुतळ्याच्या बांधकामाला २,९८९ कोटी इतका खर्च आला. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याचा आराखडा बनवला आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरदार पटेल यांच्या १४३ व्या जयंती दिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आणि तो पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.
हे ही वाचा:
बलात्कार पीडितांची आई ‘या’ मुख्यमंत्र्याविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांचे निधन
तेव्हा पासून आजपर्यंत ५५३ दिवस स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पर्यटकांसाठी खुला होता. या कालावधीत ५० लाखांपेक्षा जास्त लोकांनी या पुतळ्याला भेट दिली आहे. यात आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा आकडाही लक्षणीय आहे. कोविड मुळे २०२० साली अनेक दिवस हा पुतळा बंद होता अन्यथा ५० लाख पर्यटकांचा एकदा गेल्याच वर्षी पार झाला असता असा अंदाज आहे.
Statue of Unity crosses 5 million visitors mark in just 553 working days, making it a greatly popular international tourist destination !! @PMOIndia pic.twitter.com/rDFl1MD8CC
— Statue Of Unity (@souindia) March 16, 2021
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या या लोकप्रियतेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केले आहे. मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून लोकांना स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
Excellent!
Statue of Unity in Kevadia is a must visit. Do plan a trip there whenever you can. https://t.co/HwHN7jLaWT
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2021