35 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरक्राईमनामाटीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

टीका भोवली.. संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल

वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे, मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार

Google News Follow

Related

खारघर मधील उष्माघात मृत्यू प्रकरणी केलेली ट्विट टीका खासदार संजय राऊत यांच्या अंगलट आली आहे. खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघात व चेंगराचेंगरीमुळे १३ जणांचा मृत्यूनं झाला. या दुर्घटनेवरून विरोधकांचे राजकारण सुरु झाले आहे. खारघरमध्ये पाण्याशिवाय श्रीसेवकांना तडफडून मारले असा आरोप करत संजय राऊत यांनी ५० श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे.सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. या विधानानंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने राऊत यांच्या विरोधात मरिन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

संजय राऊतांचे हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी मरिन लाईन्स पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे.

संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीने माध्यमांशी बोलतांना बेताल वक्तव्ये केली होती. संजय राऊत हे वारंवार खारघर दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवला जात आहे. या दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यूनं झाला आहे. पण सरकार मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला होता. त्याच बरोबर राऊत यांनी या कार्यक्रमातील एक व्हायरल झालेला व्हिडीओ देखील शेअर केला होता.

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आबासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे १३ जणांचा बळी गेल्याचे जाहीर झाले आहे. परंतु संजय राऊत हे वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसले आहे. खारघरमध्ये ४० ते ५०मृत्यू झाले. त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बोलायला तयार नाही. माणसांचे जीवन पैशाने विकत घेता येत नाही. बाहेर कुठे बोलू नका असा दबाव श्रीसेवकांवर टाकला जात आहे. मृत्यू लपवण्यासाठी सरकार घरी जाऊन खोके देऊन त्यांची तोंडे बंद करत असल्याचा बेछूट आरोप राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना केला होता. या सर्व प्रकरणानंतर शिवसेनेने राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा:

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???

राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी

एकसदस्यीय समिती स्थापन

दरम्यान, खारघर येथे झालेल्या घटनेला सरकारला जबाबदार धरुन मनुष्यवधाचा गुन्हा राज्य सरकारविरोधात दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. या त्यानंतर राज्य सरकारने एकसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची ही समिती असेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा