एलन मस्क यांच्या बहुप्रतिक्षित अंतराळ चाचणीला पहिल्याच प्रयत्नात अपयशाला सामोरे जावे लागले आहे. मस्क यांच्या स्पेसएक्स या नवीन महाकाय अंतराळ यानाची गुरुवारी चाचणी झाली. टेक्सास येथून चाचणी उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटातच अंतराळ यानाचा आकाशात स्फोट झाला आणि तो मेक्सिकोच्या आखातात कोसळले. या अंतराळ यानामध्ये एकही व्यक्ती किंवा उपग्रह नव्हता. त्यामुळे मानवाला मंगळावर घेऊन जाण्याचे मस्क यांचे स्वप्न तूर्त तरी भंग झाले आहे.
टेक्सासमधील बोका चिका येथील खाजगी स्पेसएक्स अंतराळ कक्षातू स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांनी स्पेसएक्स अंतराळ यानाने अवकाशाच्या दिशेने कूच केले.या अंतराळ यानामध्ये एकूण ३३ इंजिने बसवलेली होती. प्रक्षेपण कक्षापासून सुमारे ३९ किलोमीटर उंचीवर गेल्यानंतर त्यातील अनेक इंजिनांनी काम करणे बंद केले. उड्डाणानंतर तीन मिनिटांच्या आत पहिल्या टप्प्यातील यान बूस्टरपासून वेगळे होणार होते. मात्र, ते वेगळे होऊ शकले नाही आणि यानाचा स्फोट झाला.
वास्तविक हे प्रक्षेपण सोमवारी करण्यात येणार होते. पण इंधन भरताना व्हॉल्व्हमध्ये समस्या आल्यानंतर सोमवारी रॉकेट प्रक्षेपित करण्याचा स्पेसएक्स चा पहिला प्रयत्न पुढे ढकलावा लागला. स्पेसएक्सचे नवीन अंतराळ यान हे आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ यान होते. गुरुवारी त्याच्या पहिल्या चाचणी उड्डाणात स्पेसएक्सच दक्षिण टेक्सासच्या आकाशात झेपावले आणि त्याने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला.
एलन मस्कच्या कंपनीने मॅक्सिकोच्या सीमेजवळ टेक्सासच्या दक्षिण भागातून जवळपास १२० मीटर अंतरावरून स्टारशिप अंतराळ यान प्रक्षेपित केले होते. यान हवेत झेपावल्या नंतर लगेचच बूस्टर यानापासून वेगळे करून ते मेक्सिकोच्या खाडीत पाडण्याची योजना होती. परंतु हे अंतराळ यान हवाई बेटाजवळ प्रशांत महासागर क्षेत्रात दुर्घटनाग्रस्त झाले.
हे ही वाचा:
अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्र का म्हणतोय, बरे झाले ठाकरे गेले???
राहुल गांधी यांना धक्का, मानहानीबद्दल झालेली शिक्षा कायम
आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठा
पुढच्या चाचणीसाठी खूप काही शिकायला मिळाले
रॉकेटचे उड्डाण अयशस्वी झाल्यानंतर, स्पेसएक्सने ट्विट केले की रॉकेटची उड्डाण चाचणी यशस्वी झाली नाही. एका टप्प्यात विभक्त होण्यापूर्वी अंतराळ यानाने वेगवान अनियोजित पृथक्करणाचा अनुभव घेतला. अंतराळ चाचणी अयशस्वी झाल्यानंतर, मस्कने आपल्या कर्मचार्यांचा उत्साह वाढवला. मस्क म्हणाले, स्टारशिपची रोमांचक चाचणी!स्टारशिपची रोमांचक चाचणी! पुढच्या चाचणीसाठी काही महिन्यांत खूप काही शिकायला मिळाले.