22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाविषण्ण!! प्रेयसीसाठी मुलाचा खून करून मृतदेह टाकला खाडीत

विषण्ण!! प्रेयसीसाठी मुलाचा खून करून मृतदेह टाकला खाडीत

मुलगा हरविल्याचा कांगावा करत शोध घेतला पण शेवटी पर्दाफाश झाला

Google News Follow

Related

प्रेयसीने घातलेल्या अटीतून २२ वर्षाच्या पित्याने २ वर्षाच्या मुलाची हत्या करून मृतदेह कांदळवनात फेकल्याची धक्कादायक घटना माहीम येथे घडली. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी हत्या, पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पित्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली.

असमत रहमतअली अन्सारी (२) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. रहमत अली अन्सारी (२२) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. धारावी येथील हयात कंपाउंड येथे पत्नी ताहिराबानो (२०) आणि मुलगा असमत सोबत राहण्यास होता.

रहमतअली व त्याच्या दोन मोठया भावाचे कुटुंब देखील हयात कंपाउंड या ठिकाणीच राहण्यास आहे. रहमतअलीचे त्याच्याच नात्यातील एका मुलीसोबत मागील चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते, मात्र कुटुंबियांने रहमतअलीचे लग्न गावाकडील ताहिराबानो हिच्यासोबत लावून दिले होते. लग्नानंतर देखील रहमतअली याचे नात्यातील मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरूच होते. रहमतअली आणि ताहिराबानो या दाम्पत्याला असमत हा मुलगा झाला होता. असमत हा दोन वर्षांचा झाला होता, दरम्यान रहमतअलीच्या प्रेयसीचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न जमले होते, रहमतअली तिला लग्न करू नको असे सांगत होता, परंतु तू तुझ्या पत्नीला आणि मुलाला दूर कर त्यानंतर मी तुझ्यासोबत लग्न करेन अशी प्रेयसीने त्याला अट घातली होती.

प्रेयसीच्या घातलेल्या अटीला गंभीरपणे घेऊन रहमतअली याने मंगळवारी रात्री घराजवळ खेळणारा त्याचा मुलगा असमत आणि भावाच्या दोन मुलांना घेऊन घराजवळील दुकानावर गेला, त्याने मुलांना दुकानातून खाऊ घेऊन दिला व भावाच्या मुलांना घरी पाठवले व असमतला घेऊन घराजवळ असलेल्या स्वतःच्या गाळ्यात आला व त्या ठिकाणी मुलाची गळा आणि नाक तोंड दाबून हत्या केली. त्यानंतर एका पांढऱ्या प्लास्टिकच्या पिशवीत मुलाचा मृतदेह टाकून तो घरापासून १०० मीटरवर असणाऱ्या केमकर चौक या ठिकाणी असलेल्या कांदळवनाच्या खाडीत फेकून दिला.

त्यानंतर तो रात्री अकरा वाजता घरी निघून आला, पतीला घरी एकटे आल्याचे बघून पत्नी ताहिराबानो हिने मुलगा असमत कुठे आहे असा प्रश्न रहमतअली याला विचारला असता मला माहित नाही कुठे आहे असे त्याने उत्तर दिले. त्यानंतर ताहिराबानो हिने मोठ्या दिराला फोन करून तुमची मुले घरी आली का ? असे विचारले असता त्यांनी हो म्हटल्यावर ताहिरा बानो हिने दिराला बोलावून घेत परिसरात मुलाचा शोध सुरू केला. या शोध मोहिमेत रहमतअली देखील सहभागी झाला होता. शेजारचे व परिसरातील महिला पुरुष देखील असमतचा शोध घेऊ लागले.

हे ही वाचा:

अदानीविरोधकांना हादरा, गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट

२००५ मध्ये खंडणी मागितली, अटक झाली २०२३मध्ये

आर्थिक मदतीसाठी येमेनमध्ये झाली तुफान चेंगराचेंगरी; ८० पेक्षा जास्त लोक ठार

कुत्र्यांनाही मिळाला स्थानिक अधिवासाचा हक्क, त्यांच्या परिसरातून हाकलता येणार नाही

 

शोध घेत असताना काही मंडळी पहाटे पाच वाजता केमकर चौक कांदळवनाजवळ आले असता त्यांनी खाली वाकून बघितले असता एका पांढऱ्या पिशवीतून बाहेर आलेले मुलाचे अवयव दिसून आले. लोकांनी खाली उतरून पिशवी तपासली असता त्या पिशवीत असमतचा मृतदेह आढळून आला.असमत मृतदेह मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि जमलेल्या गर्दीमधून कोणीतरी पोलीसाना याबाबत कळवले. शाहू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन असमतचा मृतदेह असलेली पिशवी ताब्यात घेऊन मृतदेह सायन रुग्णालय या ठिकाणी आणण्यात आला.

असमत मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्यानंतर पोलिसांनी हत्या, अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता ताहिराबानो हिने दिलेल्या माहितीवरून पहिला संशय तिचा पती आणि असमतचा पिता रहमतअली याच्यावर गेला. तो पर्यंत रहमतअली याने घटनास्थळा वरून पळ काढला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेत माहीम रेल्वे स्थानक येथून त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले व त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

“मुलाच्या हत्येनंतर पत्नी त्याच्या दुःखात घर सोडून निघून गेली असती व दोघांच्या जाण्याने मला प्रेयसीसोबत लग्न करता आले असते”, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली अशी माहिती शाहू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांनी दिली. या प्रकरणी शाहू नगर पोलिसांनी मुलाच्या हत्येप्रकरणी रहमतअली याला अटक केली असून गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा