25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाधक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

धक्कादायक! व्हीडिओ झाला आता बिहारच्या रेल्वेस्टेशनवर दिसली देहव्यापाराची जाहिरात

या घटनेमागे कोण आहे याचा शोध जारी

Google News Follow

Related

पाटणा रेल्वेस्थानकावर गेल्या महिन्यात एलईडीवर एक पॉर्न व्हीडिओ दाखविला जात होता.त्याचे वृत्त देशभरात पसरले.आता एलईडीवर देहव्यापाराची जाहिरातच प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

बिहार मधील भागलपूर स्टेशनवर सोमवारी रात्री देहव्यापाराची जाहिरात प्रसिद्ध झाली असून या संबंधित लोकांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.भागलपूर स्टेशन वर जाहिराती प्रसिद्ध झाल्याचे कळताच स्थानिक डीएसपी [शहर] अजय कुमार चोधरी आणि सहाय्यक धनंजय कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत डिस्प्ले बोर्ड बंद करण्यात आले.

हे ही वाचा:

टळटळीत उन्हामुळे दुपारी १२ ते ५ पर्यंत कार्यक्रम घेऊ नका!

उत्तर प्रदेशातले नामचीन गुंड अतीक – अश्रफ बीडमध्ये ठरले ‘शहीद’

कर्नाटकातून आलेल्या शिळेतून साकारणार अयोध्येतील प्रभू श्रीराम

राज्याच्या कारागृहातील कैद्यांवर असेल आता ड्रोन कॅमेऱ्यांची करडी नजर

या प्रकारात सहभागी लोकांवर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात येईल असे डीएसपी म्हणाले. माहितीनुसार स्टेशनवरील डिस्प्ले एका एनजीओ कडून बसवण्यात आला असून स्टेशन सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले होते. डिस्प्ले बोर्ड दुसऱ्या ठिकाणाहून हॅक करण्यात आला होता. काही बदमाशांनी मूळ डिस्प्ले चिप बदलल्याचा पोलिसांना संशय आहे असे कोतवाली पोलिस स्टेशनचे एसएचओ जवाहर प्रसाद यादव यांनी सांगितले.

मात्र अशा घटना सतत घडत असल्याने जनता संभ्रमातही आहे आणि आश्चर्यचकितही झाली आङे. काही दिवसांपूर्वी पाटणा रेल्वे स्टेशनवर एक पॉर्न व्हीडिओ काही मिनिटे दाखविला गेला. त्यातून प्रचंड खळबळ उडाली होती. या सगळ्या घटनांमागे नेमके कोण आहे, याचा शोध घेतला जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा