सीरियामध्ये गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे सीरियाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. येथील लोकांची आर्थिक घडी पार विस्कटून गेली आहे. अशा परिस्थितीत मशरूमची विक्री करून गुजराण करावी लागत आहे. या हंगामी भाजीची किंमत खूप जास्त असल्याने येथील नागरिकांना थोडाफार उत्पन्नाचा आधार होत आहे. पण आता या आधारावर घाला घातला आहे. सीरियातील हमा शहरातील वाळवंटी भागात मशरूम पिकवण्यासाठी गेलेल्या ३१ शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली आहे. सीरियन ऑब्झर्व्हेटरी या ब्रिटनच्या मानवाधिकार संघटनेने या घटनेची माहिती दिली आहे. इसिस या दहशतवादी संघटनेने हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सीरियन ऑब्झर्व्हेटरीच्या म्हणण्यानुसार आयएसआयच्या या हल्ल्यामध्ये २६ लोक मारले गेले आहेत. अन्य एका घटनेमध्ये दहशतवादी संघटनेने ४ मेंढपाळांची हत्या केली असून दोन जणांचे अपहरण करण्यात आले आहे. ठार झालेल्यांमध्ये ३१ लोकांमध्ये १२ सैनिकांचाही समावेश आहे. हे सर्वजण ह्मा या मध्यवर्ती शहराच्या पूर्वेकडील वाळवंटात मशरूम गोळा करत होते. त्याच वेळी या लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मोटरसायकलवरून आलेल्या जिहादींनी मेंढपाळांच्या गटावर स्वयंचलित रायफलने हल्ला करून त्यांच्या मेंढ्या चोरल्या आणि दोन लोकांचे अपहरण केल्याचे सांगण्यात येत आहे.
जगाच्या मध्यपूर्वेत सीरियामध्ये, इस्लामिक स्टेट गटाच्या दहशतवाद्यांनी सध्या वाळवंटात मश्रुम पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना लक्ष्य केले आहे. अलीकडेच या दहशतवाद्यांनी १५ शेतकऱ्यांचा गळा चिरून हत्या केली होती. ट्रफल नावाच्या सीरियन वाळवंटातील मशरूमला जगात मोठी मागणी आहे. ते खूप मौल्यवान देखील आहे. याची किंमतही जास्त आहे.
हे ही वाचा:
प्रवाशांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या शारुख सैफी विरोधात युएपीए अंतर्गत होणार कारवाई
पायधुनीत तलवार गँगचा धूमाकूळ, दुकानात नाचविल्या नंग्या तलवारी
महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू
रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…
आता पर्यंत २३०लोकांची हत्या
सरकारी निर्बंध असूनही लोक अनेकदा दुर्गम वाळवंटात मशरूम पिकांसाठी जातात. परंतु सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राइट्सच्या मते, फेब्रुवारीपासून आतापर्यंत सुमारे २३० लोक मारले गेले आहेत. ट्रफल्सचा शोध घेत असताना अनेक शेतकऱ्यांना आयएसआयच्या दहशतवाद्यांनी गोळ्या गोळ्या घातल्याने नाही तर भूसुरुंगांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे .