आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात उष्माघातामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर गेला आहे. त्यातील यामध्ये आठ महिला, तर तीन पुरुषांचा समावेश असून अनेकजण अत्यस्वस्थ आहेत.
यातील मृतांची नावे समोर आली असून एमजीएम हॉस्पिटल एक, भारती मेडिकल हॉस्पिटल २ आणि टाटा हॉस्पिटलमध्ये ८ असे ११ जणांचा समावेश आहे. उर्वरित अत्यवस्थ श्रीसेवकांवर नवी मुंबईतील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. कडक उन्हात तासनतास बसल्यामुळे मळमळ, उलट्या आणि जुलाब असे त्रास झाले.
हे ही वाचा:
पंजाबमधील गोळीबार जवानांच्या हत्येप्रकरणी एका जवानाला अटक
महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्याला गालबोट, उष्माघातामुळे १० जणांचा मृत्यू
रत्नागिरी बस स्थानक प्रवाशांच्या सेवेसाठी की त्रासासाठी…
दहशतीचा, अत्याचारांचा अध्याय संपुष्टात आला!
मृतांची नावे
तुळशीराम भाऊ वागडे (५८, जांभूळ विहीर ता. जव्हार), जयश्री जगन्नाथ पाटील (५४, रा. वारळ पो. मोदडी ता. म्हसळा, रायगड), महेश नारायण गायकर (४२, रा. मुंबई, मूळ रा. मेदडू ता. म्हसळा, रायगड), मंजुषा कृष्णा भोगडे (रा. भुलेश्वर, मुंबई, मूळ रा. श्रीवर्धन), भीमा कृष्णा साळवे (५८, रा. कळवा, ठाणे), सविता संजय पवार (४२, रा. मंगळवेढा, सोलापूर), स्वप्नील सदाशिव किणी (३२, रा. विरार). पुष्पा मदन गायकर (६३, कळवा, ठाणे), वंदना जगन्नाथ पाटील (६२ रा. माडप. ता. खालापूर), कलावती सिद्धराम वायचल (रा. सोलापूर) आणि ११ वी व्यक्ती अनोळखी आहे. एकूण ११ पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले असून एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे. त्यांच्या वारसाचा शोध सुरू आहे.