31 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामादुहेरी हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू

दुहेरी हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशात कलम १४४ लागू

अफवांकडे लक्ष देऊ नका,शांतता राखण्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आवाहन

Google News Follow

Related

प्रयागराजमध्ये कुख्यात माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांच्या शनिवारी रात्री झालेल्या गोळीबार हत्याकांडानंतर उत्तर प्रदेश सरकारने रविवारी रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे . राज्यातील संवेदनशील शहरांवर पोलिसांची करडी नजर आहे. विशेष खबरदारी घेतली जात आहे.

मुख्यमंत्री योगी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी रविवारी सकाळी प्रयागराजमध्ये फ्लॅग मार्च काढला. मऊ, मथुरा, कानपूर, अयोध्या, बांदा आणि लखनौमध्ये पोलिसांनी रात्री अनेक वेळा फ्लॅग मार्च काढला. मुख्यमंत्री योगी यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम पुढे ढकलले आहेत. राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर ते सतत लक्ष ठेवून असतात. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कोणाच्याही जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

अतिक-अश्रफ हत्याकांडानंतर प्रयागराजमध्ये पोलिसांनी सतर्कतेचा आदेश दिला आहे. जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.अतिरिक्त सुरक्षा दलही तैनात करण्यात आले आहे. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेनंतर १७ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.प्रयागराजमधील सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही कुचराई होऊ नये आणि शांतता अबाधित राहावी यासाठी फतेहपूर, कौशांबी, प्रतापगड, बांदा, चित्रकूट येथून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रयागराजला पाठवले. पोलीस कोठडीत अतिक आणि अशरफ यांची हत्या झाल्यानंतर संपूर्ण प्रयागराजमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय पथक तयार करण्यात आले आहे.

अफवा पसरवणाऱ्यांना इशारा
अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. अतिक-अश्रफ खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिघांचीही प्रयागराजमध्ये चौकशी सुरू कायदा सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महासंचालकप्रशांत कुमार यांनी सांगितले. आरोपी लवलेश तिवारीच्या वडिलांनी आपला मुलाशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तो व्यसनी स्वभावाचा आहे. तो एकदा तुरुंगातही गेला आहे. तो अधूनमधून घरी यायचा. आरोपी लवलेश हा बांदा येथील रहिवासी आहे.

हे ही वाचा:

अतिक हत्याकांडानंतर गृहमंत्रालय सतर्क, पत्रकारांसाठी येणार मार्गदर्शकतत्वे

नंदिनी गुप्ता ठरली ‘मिस इंडिया’

राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी

देशात कोविडचे १०,०९३ नवे रूग्ण, तरीही किंचित घट

अतिकवर शनिवारीच झाले अंत्यसंस्कार
अतिक अहमद यांचा मुलगा असद हा झाशी येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना झालेल्या चकमकीत ठार झाला आहे . शनिवारीच प्रयागराजमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माफियातून राजकारणी झालेला अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांची १५ एप्रिलच्या रात्री प्रयागराजमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना हत्या करण्यात आली. २००५ मध्ये झालेले बसपा आमदार राजुपाल हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये उमेशपाल हत्याकांडातही अतिक आरोपी होता.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा