जपानचे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्यादिशेने एक बॉम्ब फेकल्याची घटना घडली असून त्यात कुणालाही इजा झालेली नाही. क्योदो या प्रमुख न्यूज एजन्सीने हे वृत्त दिले आहे. हा धुराचा बॉम्ब असल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे.
ही घटना जपानच्या वाकायामा याठिकाणी घडली. तिथे किशिदा यांचे भाषण होत होते तिथेच या व्यक्तीने बॉम्बफेक केली. पण त्याला आता अटक करण्यात आली आहे.
अद्याप या घटनेची पुष्टी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली नसली तरी ज्या व्यक्तीने हे कृत्य केले त्या पकडण्यात आले आहे आणि पंतप्रधान किशिदा यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पान दुकानदारांना ‘चुना’ लावणारा तोतया पोलीस जेरबंद
मुंबई पुणे जुन्या मार्गावर बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू
बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या विरोधात सीबीआयचे दोन गुन्हे दाखल
जेव्हा या व्यक्तीने नळकांडे सदृश वस्तू पंतप्रधानांच्या दिशेने फेकली तेव्हा त्याचा स्फोट झाला. पण पंतप्रधान सुरक्षित होते. हा स्फोट झाल्याचा आवाज झाल्यावर तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आणि ते सैरावैरा धावू लागले. तशा पद्धतीचे व्हीडिओ आता सोशल माध्यमांमध्ये फिरत आहेत.
🔴 #AHORA | El momento de la fuerte explosión a metros del Primer Ministro de Japón, Fumio Kishida. ❗️ pic.twitter.com/wVzSQX2DTe
— Mundo en Conflicto 🌎 (@MundoEConflicto) April 15, 2023
सोशल मीडियावर जे व्हीडिओ शेअर केले आहेत त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडल्याचे दिसते आहे. याआधी किशिदा यांच्याआधी पंतप्रधान असलेले शिंजो आबे यांच्यावरही असा हल्ला करण्यात आला होता आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. तेही आपल्या पक्षाच्या प्रचारार्थ भाषण करत होते. जपानमध्ये जी ७ गटातील देशांचे प्रतिनिधी हिरोशिमा येथे एकत्र येणार आहेत.