मुंबईत दुबईहून तीन इसम शिरले आहेत आणि ते अतिरेकी असून पाकिस्तानशी त्यांचा संबंध असल्याचा फोन काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना आला होता. त्याचे धागेदोरे पोलिसांना सापडले असून त्यामागची कहाणी मात्र वेगळीच असल्याचे निदर्शनास आले आहे.
वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून चुलत भावाला आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी भावाला पाकिस्तानी अतिरेकी बनवून पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला खोटा कॉल करणाऱ्या एकाला एटीएसने अहमदनगर जिल्ह्यातून अटक केली आहे. भावाला आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
यासिन याकुब सय्यद असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. यासिन सय्यद आणि त्याचा चुलत भाऊ मुजिब मुस्तफा सय्यद हे कुटुंबासह अहमदनगर जिल्ह्यात राहण्यास आहे.अहमदनगर शहरातील भवानी नगर परिसरात या दोन्ही कुटुंबाची वडिलोपार्जित साडेपाच गुंठ्याचा सामाईक प्लॉट आहे. या जागेवरून दोन्ही कुटुंबात वाद सुरू आहे.
हे ही वाचा:
आधी सावरकरांची माफी मग, मगच महाराष्ट्रात पाऊल ठेवा!
आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा
ईशान्य भारताला मिळाले पहिले एम्स रुग्णालय
जगनमोहन रेड्डी यांचे पोस्टर फाडणाऱ्या कुत्र्याची केली तक्रार
यावादातून यासीन याने चुलत भाऊ मुजीब आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी ७ एप्रिल रोजी यासीन याने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून स्वतःला पुण्याहून राजा ठगे बोलत असल्याचे सांगून ” मुंबई येथे दुबई वरुन पहाटे तीन इसम आले आहेत ते अतिरेकी असुन त्यांचा पाकिस्तानशी संबंध आहे. त्यातील एका व्यक्तीचे नाव मुजिब मुस्तफा सय्यद असे सांगून मोबाईल क्रमांक आणि वाहनाचा क्रमांक दिला होता.
या प्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहशतवाद विरोधी पथकाने गुन्ह्याचा तपास करून यासिन याकुब सय्यद याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.