27 C
Mumbai
Saturday, November 9, 2024
घरक्राईमनामागौतम नवलाखांच्या आयएसआयशी संबंधांच्या शक्यतेवरून एनआयएने जामीन नाकारला  

गौतम नवलाखांच्या आयएसआयशी संबंधांच्या शक्यतेवरून एनआयएने जामीन नाकारला  

आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी फई यांच्याशी संबंध

Google News Follow

Related

एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा आयएसआयशी संबंध असल्याची शक्यता एनआयएच्या विशेष न्यायालयाने व्यक्त केली आहे. याच कारणावरून एनआयएच्या विशेष न्यायालयाने नवलाख यांना जमीन देण्यास नकार दिला  आहे.

गौतम नवलखा आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयचा एजंट सय्यद गुलाम नबी फई यांच्यात संबंध असल्याचे विशेष एनआयए न्यायालयाने म्हटले आहे. अमेरिकेतील टेरर फायनान्सिंग प्रकरणात फईला दोषी ठरवण्यात आले होते.   मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात विशेष न्यायाधीशांनी दिलेला आदेश बाजूला ठेवत नवलखा यांना जामीन मंजूर केला होता. परंतु विशेष न्यायालयाने  नवलखाचे आयएसआय एजंटशी संबंध दिसून येत असल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट करतांना नवलखाला जामीन देण्यास नकार दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात विशेष न्यायाधीशांनी दिलेला आदेश बाजूला ठेवला होता आणि नवलखा यांच्या जामीन याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. विशेष न्यायालयाच्या आदेशात फिर्यादीने जोडलेल्या पुराव्यांच्या विश्लेषणाचा समावेश नाही , असे  उच्च न्यायालयाने म्हटले होते.विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश राजेश कटारिया यांनी ६ एप्रिल रोजी नवीन युक्तिवाद ऐकल्यानंतर ६९ वर्षीय कार्यकर्त्याला जामीन नाकारला. याबाबतचा सविस्तर आदेश गुरुवारी उपलब्ध करून देण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई येथे राहणारे  नवलखा यांना ऑगस्ट २०१८मध्ये अटक करण्यात आली होती आणि सुरुवातीला त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एप्रिल २०२० मध्ये त्यांना  नवी मुंबईतील तळोजा कारागृहात हलवण्यात आले.   एका महिन्यासाठी नजरकैदेत ठेवण्यास परवानगी देण्याची नवलाख यांनी गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी  केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केली होती.

नवलखा यांनी  एफआयने आयोजित केलेल्या काश्मिरी अमेरिकन कौन्सिल परिषदेला संबोधित करण्यासाठी तीनदा अमेरिकेला भेट दिली होती. तो इमेलद्वारे गुलाम नबी फई यांच्या संपर्कात होता. दोघांचे  कधी-कधी फोनवर संभाषण होत असे. आयएसआय आणि पाकिस्तान सरकारकडून पैसे स्वीकारल्याच्या आरोपावरून गुलाम नबी फईला  जुलै २०११ मध्ये एफबीआयने अटक केली होती. अर्जदाराने गुलाम फै यांच्या खटल्याचा खटला चालवणार्‍या अमेरिकन न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही एक पत्र लिहिले होते. या सर्व घटनांवरून  प्रथमदर्शनी नवलखा आणि सय्यद गुलाम नबी फै यांच्यातील संबंध दर्शवत असल्याचे एनआयने म्हटले आहे.

हे ही वाचा:

प्रखर धर्माभिमानी काजल हिंदुस्थानी यांना अखेर जामीन मंजूर

करमुसे म्हणतात,वैभव कदमच्या मृत्यूचा सूत्रधार कोण?

म्हणजे संजय राऊतांनी मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडले तर…

मास मीडियाचा कोर्स, पत्रकार, डान्स बार मग घरफोड्या

एल्गार परिषदेतील प्रक्षोभक भाषणानंतर अटक

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणाबद्दल नवलखा यांना अटक करण्यात आली होती.  पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाषणांमुळे दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा युद्ध स्मारकाच्या आसपासच्या परिसरात जातीय दंगली उसळल्या. त्यानंतर  या प्रकरणाचा तपास एनआयएने ताब्यात घेतला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा