पाटणा न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावावर केलेल्या टिप्पणीवरून दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात २५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राहुल गांधी बुधवारी पाटणा न्यायालयात हजर राहणार होते, मात्र याच प्रकरणात हजर राहिल्याने ते काल सुरत न्यायालयात हजर राहू शकले नाहीत. या संदर्भात राहुल गांधी यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्या अशिलाला याच प्रकरणात १३ एप्रिल रोजी सुरत न्यायालयात हजर राहायचे आहे. त्यामुळे ते आज पाटण्याला येऊ शकले नाहीत.
आता पाटणा येथील खासदार-आमदार न्यायालयात आता पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी होणार आहे. या सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी राहुल गांधी यांना समन्स बजावण्यात आले आहे.पाटणा खासदार-आमदार न्यायालयाचे विशेष न्यायाधीश आदिदेव यांनी राहुल गांधी यांना २५ एप्रिलला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. याप्रकरणी राहुल गांधी पाटणा कोर्टातून सध्या जामिनावर बाहेर आहेत. राहुल गांधी २५ एप्रिलला न्यायालयात हजर झाले नाहीत तर न्यायालयाकडून त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंटही जारी केले जाऊ शकते.
राहुल गांधी यांनी २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मोदी आडनावावर ‘सर्व चोरांना मोदी आडनाव का असते?’ अशी वादग्रस्त टिप्पणी केली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी ‘मोदी आडनाव’बाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी याच वर्षी हा खटला दाखल केला होता. सुरत येथील न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना गेल्या महिन्यात दोषी ठरवण्यात आले . त्यानंतर राहुल गांधी यांना लोकसभेसाठी अपात्र ठरवून दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
विशेष न्यायदंडाधिकारी आदि देव यांच्या खासदार-आमदार न्यायालयाने १८ मार्च रोजी राहुल गांधी यांना १२ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी सध्या संपूर्ण टीम सुरतच्या खटल्यात व्यस्त असल्याचे सांगत दुसरी तारीख देण्याची विनंती न्यायालयाला केली.
हे ही वाचा:
कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी
उद्धव ठाकरेंशी ताडोबाबद्दल आणि वाघांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल चर्चा
म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला
सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर
यावर न्यायमूर्तींनी गांधींच्या वकिलांना या खटल्याच्या सुनावणीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ एप्रिल रोजी काँग्रेस नेत्याची प्रत्यक्ष उपस्थिती निश्चित करण्यास सांगितले आहे. सुनावणी संपल्यानंतर सुशील कुमार मोदी यांची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकील प्रिया गुप्ता यांनी तक्रारदाराच्या बाजूचे सर्व पुरावे पूर्ण झाले आहेत, सर्व पुरावे न्यायालयाला देण्यात आले आहेत आणि आता गांधी यांचे म्हणणे नोंदवणे अजून बाकी आहे. असे सांगितले.