34 C
Mumbai
Friday, November 8, 2024
घरविशेषकेशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

केशुब महिंद्रा यांचे ९९ व्या वर्षी निधन

आनंद महिंद्र यांचे काका तसेच महिंद्र अँड महिंद्रचे अध्यक्ष

Google News Follow

Related

देशातील सर्वांत वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष केशुब महिंद्रा यांचे बुधवारी निधन झाले. ते ९९ वर्षांचे होते. ते ज्येष्ठ उद्योगपती आणि आनंद महिंद्रा यांचे काका होते.

महिंद्रा यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९२३ रोजी झाला होता. त्यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या ४८ वर्षांच्या कालावधीत, महिंद्रा समूहाचा विस्तार ऑटोमोबाईल उत्पादक ते आयटी, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर व्यवसाय विभागांमध्ये झाला. यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे ते पदवीधर होते. १९४७ मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर १९६३ मध्ये ते चेअरमन झाले.

विलीज कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, युनायटेड टेक्नॉलॉजीज, ब्रिटीश टेलिकॉम आणि इतर बऱ्याच मोठ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महिंद्राच्या वेबसाइटनुसार केशुब महिंद्रा यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. २००४ ते २०१० पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे सदस्य होते. त्यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कौन्सिलवरही काम केले आहे.

हे ही वाचा:

धबधबे, हिरवाई, नद्या, शेतीदर्शनासाठी अधिक प्रवासी तेजसला जोडणार

पंजाबमधील लष्करी तळावरच्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू

…आणि एक पक्ष संपला!

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

अलीकडेच, केशुब महिंद्रा यांचा समावेश फोर्ब्स मासिकाने २०२३ च्या यादीत केला होता. फोर्ब्सने सांगितले होते की, ते सर्वांत वयस्कर भारतीय अब्जाधीश आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
189,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा