पंतप्रधान नरेंद्र मोदी दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. काही तरी नाविन्यपूर्ण माहिती, प्रवाहाच्या पलीकडे जाऊन काही तरी वेगळे करणाऱ्यांचे कौतुक असेल किंवा सल्ला असेल अशा विविध माध्यमांद्वारे पंतप्रधान जनतेशी गप्पा मारतात. लोकांच्या पसंतीस उतरलेला मन की बात कार्यक्रम येत्या रविवारी शतक ठोकणार आहे. म्हणजेच या कार्यक्रमाचा १०० व भाग प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सध्या जोरात तयारी देशभरात करण्यात येत आहे.. विविध ठिकाणी हा कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. १०० व्या कार्यक्रमानिमित्त नाविन्यपूर्ण संकल्पना सुचविण्याचे आवाहन पंतप्रधांनी केलेलं आहे. त्याच्या सोबतच एक अनोखी क्विझ स्पर्धा घेण्यात येणार असून त्यासाठी बक्षिसही देण्यात येणार आहे.
३ ऑक्टोबर २०१४ रोजी, दसऱ्याच्या दिवशी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात चे रेडिओ प्रसारण सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पाहता लाखो बूथ उभारून ‘मन की बात’ जगभर प्रसारित केली जाणार आहे. १०० बुथवर हा कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदीं यांनी ज्या पद्मभूषण आणि पद्मश्रीने सन्मानित व्यक्तींचा उल्लेख केला होता ते मान्यवर तसेच भाजपचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. ‘मन की बात’ च्या १०० व्या भागामध्ये पंतप्रधान नैसर्गिक शेतीला चालना देण्याबाबत देशवासीयांशी बोलणार आहेत. ऑल इंडिया रेडिओने पीएम मोदींच्या निवडक म्हणींचा समावेश करून एक कार्यक्रमही तयार केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’च्या १००व्या भागाच्या निमित्ताने भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेतेही सहभागी होणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात १०० ठिकाणी १०० लोक पंतप्रधान मोदी यांचे ‘ विचारांचे महत्व ऐकतील.
पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या क्विझमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. येत्या ३० एप्रिल महिन्यात ‘मन की बात’चा १००वा एपिसोड असेल. त्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने , एक प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करत आहे. यामध्ये कोणालाही सहभागी होता येणार आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये फक्त पाच प्रश्नांची उत्तरे देऊन ४,००० रुपयांचे बक्षीस जिंकण्याची संधी आहे. पहिल्या २५ विजेत्यांना प्रत्येकी ४,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख १७ एप्रिल आहे. म्हणजेच १७ एप्रिलनंतर क्विझमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज केला तर तुम्हाला ही संधी मिळणार नाही.
हे ही वाचा:
कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी
उद्धव ठाकरेंशी ताडोबाबद्दल आणि वाघांच्या वाढलेल्या संख्येबदद्ल चर्चा
म्यानमारच्या नागरिकांवर लष्कराचा सतत २० मिनिटे गोळीबार, बॉम्बहल्ला
सचिन वाझेला मुकेश अंबानी आणि कुटुंबाबद्दल वाटतो आदर
१०० वा भाग १०० मदरसे
उत्तर प्रदेशमध्ये ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा १०० वा भाग मदरसे आणि अल्पसंख्याक बहुल भागात प्रसारित केला जाईल. मदरशांमध्येही ते ऐकले जावे, यासाठी भाजपने त्यांच्या अल्पसंख्याक शाखेला काम दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दर्गे, खानकाहो आणि मदरशांमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. त्यामुळे सरकार आणि मुस्लिमांमध्ये निर्माण झालेले अनेक गैरसमज दूर होतील. संवादाची प्रक्रिया सुरू होईल असे बरेलीचे मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनीम्हटले आहे.
या अटी व शर्तीं पूर्ण करा आणि सहभागी व्हा
प्रश्नमंजुषा इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत खेळता येईल.
स्पर्धेत फक्त एकदाच खेळण्याची परवानगी आहे.
“स्टार्ट क्विझ” बटणावर क्लिक करताच क्विझ सुरू होईल.
क्विझचा कमाल कालावधी १५० सेकंद आहे आणि कोणतेही नकारात्मक मानांकन नसेल
जर अनेक समान उत्तरे असतील तर, कमीत कमी वेळ असलेल्या सहभागीला विजेता घोषित केले जाईल.
प्रश्नमंजुषा भारतातील सर्व रहिवासी किंवा भारतीय वंशाच्या व्यक्तींसाठी खुली आहे.
सहभागी होण्यासाठी काय कराल
प्रथम Quiz.mygov.in ला भेट द्यावी. येथे उजव्या बाजूला MannKiBaat@100 बॉक्स दिसेल. याशिवाय स्पर्धकांना त्यांचे नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि शहराची माहिती द्यावी लागेल. तसेच, प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी एकच मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता एकापेक्षा जास्त वेळा वापरता येणार नाही.