27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणकर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने दिली ५२ नवीन चेहऱ्यांना संधी

उमेदवारांची पहिली यादी जाहीर,

Google News Follow

Related

कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी १८९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ५२ नवीन नावे आहेत. यादीत इतर मागासवर्गीयमधील ३२, अनुसूचित जाती मधील ३०आणि अनुसूचित जमाती मधील १६ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत९डॉक्टर, सेवानिवृत्त आयएएस , आयपीएस , ३१ पदव्युत्तर आणि ८ महिलांना तिकीट दिले आहे.

विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे शिगगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत . भाजपचे इतर प्रमुख नेते रमेश जारकीहोळी गोकाक आणि गोविंद एम कर्जोल हे मुधोळ मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी हे चिक्कमगलुरूमधून निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांना टक्कर देण्यासाठी भाजपने सोमन्ना आणि आर अशोक यांना उमेदवारी दिली आहे. ते प्रत्येकी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना शिकारीपुरा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. राज्यमंत्री बी श्रीरामुलू हे बेल्लारी ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. बसवराज सोमप्पा बोम्मई हे २००८ पासून कर्नाटकातील शिगगाव मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००८ आणि २०१३ मध्ये ते जलसंपदा आणि सहकार मंत्री होते. बोम्मई यांनी चौथ्या येडियुरप्पा सरकारमध्ये गृह, सहकार, कायदा आणि न्याय, संसदीय कामकाज आणि कर्नाटक विधानमंडळ मंत्री म्हणून काम केले आहे.

शिगगाव विधानसभा जागा हावेरी जिल्हा आणि मुंबई कर्नाटक प्रदेशात येते. या मतदारसंघात एकूण २,०९,६२९मतदार असून त्यात सर्वसामान्य मतदार, अनिवासी भारतीय मतदार आणि सेवा मतदारांचा समावेश आहे. सर्वसाधारण मतदारांमध्ये १,०९,४४३ पुरुष, १,००,०७७ महिला आणि ६ इतर आहेत. या भागातील मतदारांचे लिंग गुणोत्तर ९१.३६आहे आणि साक्षरता दर ७४% च्या जवळपास आहे.

हे ही वाचा:

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका

मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा सापडला पुण्यात, पोलिसांनी घेतले ताब्यात

अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; आता तारीखही दिली

 पहिल्या यादीत ११ विद्यमान आमदारांचा पत्ता कट
कर्नाटकात कमळ फुलवण्यासाठी भाजप कोणतीही कसर सोडू इच्छित नाही. त्यामुळेच पहिल्या यादीत ११ विद्यमान आमदारांची तिकिटे नाकारण्यात आली आहेत. या यादीत रामदुर्गातून महादेवप्पा, शिरहिटीमधून रामण्णा लमाणी, बेळगुम उत्तरमधून अनिल बेनके, सुल्यामधून एस. अंगार, कापूमधून लालाजी मेंडन ​​यांची तिकिटे कापण्यात आली आहेत. तिकीट कापल्यानंतर भाजप आमदार महादेवप्पा यादव यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्री जोरदार निदर्शने केली.कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि सहा वेळा आमदार जगदीश शेट्टर यांचेही भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नाही.अथणी मतदारसंघातून तिकीट नाकारण्यात आल्यानंतर कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

१० मे रोजी मतदान, १३ मे रोजी निकाल
कर्नाटक विधानसभा निवडणुका एकाच टप्प्यात १० मे रोजी होतील. त्याचा निकाल १३मे रोजी लागणार आहे. कर्नाटकात ५.२१ कोटी मतदार आहेत, जे २२४ विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत. भाजप लवकरच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा