30 C
Mumbai
Monday, October 21, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका

उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत असताना विरोधक मात्र उदासिन असल्याबद्दल आश्चर्य

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात भेट दिली आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला. त्यांच्यासाठी १७७ कोटींची मदतही जाहीर करण्यात आली. एकीकडे सत्ताधारी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करत असताना विरोधक मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला गेल्याचे का दिसत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे हे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने बांधावर जायला हवे अशी मागणी करतात मात्र विरोधक म्हणून ते अद्याप बांधावर का आलेले नाहीत, असा प्रश्नही विचारला जात आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना विरोधी पक्ष नेता या नात्याने देवेंद्र फडणवीस हे कोरोनाच्या काळातही विविध ठिकाणी जाऊन पाहणी करत होते. महाराष्ट्रात तेव्हा आलेला पूर असो की वादळे फडणवीस यांनी ठिकठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल माहिती करून घेतली. तसेच सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याविषयी आग्रही मागणी केली. पण आता अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झालेले दिसत असताना विरोधी पक्ष मात्र कुठेही दिसत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांबाबत सातत्याने कळवळा असल्याची भाषा करणारे विरोधक आता शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसत नाहीत, याबद्दल शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका असल्याचे दिसते. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, मी घरी बसून कारभार करत होतो अशी टीका करता तर आता मुख्यमंत्र्यांनी तरी बांधावार जावे, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.   भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि विरोधकांवर शरसंधान केले आहे.

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देंवेद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना राज्यात कोविड असो, दुष्काळ असो वा अवकाळी पाऊस, राज्यभर फिरून जनतेला दिलासा द्यायचे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचे. सध्याचे विरोधी पक्षनेते मात्र शेतकरी संकटात सापडलेला असताना गायब आहेत. आमदार भातखळकर यांनी असेही म्हटले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यभर फिरतायत. परंतु काही घरकोंबडे घरबसल्या कु कूच कू करतायत. सभेसाठी खेड, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरला जाणारे, शेतकऱ्याचे अश्रू पुसायला बांधापर्यंत जात नाहीत. यांच्या बोगसपणा मर्यादा नाही.

हे ही वाचा:

राहुल गांधी आता ‘ट्रोल’ पुरते उरले!

भारतात मुस्लिमांची स्थिती पाकिस्तानपेक्षा चांगली!

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही ! हवालदिल बळीराजाला मुख्यमंत्र्यांचा दिलासा

सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात वादळांनी धुमाकूळ घातला होता. त्योक्ते आणि निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा महाराष्ट्राला बसला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी या नुकसानग्रस्तांसाठी फार कमी वेळ दिल्यामुळे टीका झाली होती. कोकणात, अलिबागला ते गेले पण ती धावती भेट असल्याचा आरोप तत्कालिन विरोधकांकडून करण्यात आला होता.   राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेता आहेत पण तेही नुकसानग्रस्त भागाची तसेच या नुकसानीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांची विचारपूस करायला का गेलेले नाहीत, असा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवारांनीही विविध ठिकाणी केलेल्या भाषणांत शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल दुःख व्यक्त केले पण ते स्वतः मात्र अजूनही या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भेटायला गेलेले नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करण्यासाठी गेलेले असताना ते कसे रात्री अंधारात शेताची पाहणी कशी काय करत आहेत, अशी टीका करण्यात आली होती. पण विरोधक मात्र एकदाही शेतात उतरलेले नाहीत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती की, मुख्यमंत्री अयोध्येला जातात पण इथे महाराष्ट्रात शेतकरी संकटात असताना त्याला भेटायला त्यांना वेळ नाही. इथे शेतातच त्यांना खरा राम भेटू शकेल. थोरात यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली असली तरी तेही पक्षाचे प्रमुख नेते या अर्थाने नुकसानग्रस्त भागाला भेट देण्यासाठी गेलेले नाहीत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा