बॉलीवूड स्टार सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई आणि त्याच्या टोळीकडून जीवे मारण्याच्या अनेक धमक्या आल्या आहेत. सतत धमक्या मिळाल्यानंतर सलमानला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे.पण आता सलमान खानने आणखी सतर्क होऊन स्वतःच आपल्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था केली आहे. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईकडून पुन्हा धमकीचा इ-मेल सलमान खानला आला होता .त्यानंतर सलमान पांढऱ्या रंगाची बुलेटप्रूफ लँड क्रूझर एसयूव्हीमधूनच फिरत आहे. आता सलमानने महागडी बुलेट प्रूफ एसयूव्ही कार खरेदी केली आहे. ही एसयूव्ही आता सलमानचे संरक्षण करणार आहे.
सलमान खानने निसान ही पेट्रोल एसयूव्ही खरेदी केली आहे. ही एसयूव्ही सध्या भारतीय बाजारात उपलब्ध नाही. सलमान खानने ही एसयूव्ही खास आयात केली असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय बाजारपेठेत या एसयूव्हीची किंमत सुमारे ८० लाख ते १ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.
सलमान खानच्या बुलेटप्रूफ एसयूव्हीमध्ये बी ६ किंवा बी ७ दर्जाची सुरक्षा आहे. बॅलिस्टिक संरक्षणासह या एसयूव्हीला ४१ मिमी जाडीची काच बसवण्यात आली आहे. त्यामुळे अत्याधुनिक रायफलने गोळ्या झाडल्या तरी त्याचा कोणताही परिणाम होत नाही तर ७८ मिमी जाडीची काच आतील व्यक्तीचे चिलखतीसारखे संरक्षण करते. ही कार आता सलमान खानच्या आधीच्या टोयोटा लँड क्रूझर ची जागा घेईल. या टोयोटा लँड क्रूझर का रमध्येही चिलखत आणि बुलेटप्रूफ काच सारखे बदल बदल करण्यात आले होते.
हे ही वाचा:
कुनोतून पाळलेला ओबन चित्ता घरी परतला , आशाची मात्र अजूनही निराशा
१५५ देशांतील नद्यांच्या पाण्याने करणार रामललाचा जलाभिषेक
७१ हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्या
नरेंद्र मोदींवर विश्वास व्यक्त करत आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार भाजपात
निसान एसयूव्ही शिवाय सलमान खानकडे टोयोटा लँडक्रूझर, मर्सिडीज बेंझ एस-क्लास, लेक्सस एलएक्स ४७०, ऑडी ए८ , पोर्श केयेन, रेंज रोव्हर ऑटोबायोग्राफी, ऑडी आरएस ७, मर्सिडीज एएमजी जीएलई ६३ एस आणि मर्सिडीज बेंझ जीएल-क्लास अशा कारचा ताफा आहे