इमारतीच्या गच्चीवर बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर सायन रुग्णालयात उपचार सूरु असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुरुवारी सायंकाळी माटुंगा पूर्व येथे घडलेल्या घटने प्रकरणी या घटनेला जबाबदार व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम सहाय तिवारी (५२) असे या घटनेत मृत झालेल्या कामगाराचे नाव असुन जखमी अरविंद मिराशी(४५) याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघे वडाळा येथे राहणारे आहेत. माटुंगा पूर्व २४७ अ तेलंग रोड, रुईया महाविद्यालयाच्या मागे शिव निर्मल या १९ मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
हे ही वाचा:
कार्यकर्त्यांच्या कष्टामुळे भाजपाचे वटवृक्षात रूपांतर
नायजेरियात बंदुकधाऱ्याने गोळीबार करून मारले ५० जणांना
भाजपा सरकार पुरस्कार देईल असे वाटले नव्हते, पण मोदीजी तुम्ही मला चुकीचे ठरवलेत!
काँग्रेस नेते ए.के. अँटनींचे चिरंजीव अनिल अँटनीनी धरला भाजपाचा हात
हे दोघे कामगार या ठिकाणी काम करीत होते, इमारतीच्या गच्चीवर ३० फूट उंच पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना कामगारांच्या सुरक्षेचा कुठलाही उपाय न केल्यामुळे गुरुवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही कामगार ३० फूट उंच पाण्याच्या टाकीवरून गच्चीवर कोसळून गंभीर जखमी झाले. त्या ठिकाणी उपस्थित इतर कामगारांनी या दोघांना उपचारासाठी सायन रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी दोघाना तपासून राम तिवारी याला मृत घोषित केले, व अरविंद याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहे.
घटनास्थळी दाखल माटुंगा पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वपोनि. दीपक चव्हाण यांनी दिली.