दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जगातील १० सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत स्थान पटकावले आहे. व्यस्त विमानतळांच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा नवव्या क्रमांकावर असल्याचे एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या रँकिंगमध्येमध्ये म्हटलं आहे. दिल्ली विमानतळ हे भारतातील सर्वात मोठे आणि दक्षिण आणि आग्नेय आशियातील एकमेव विमानतळ आहे.
जगात हवाई प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रवाशांची वाढती संख्या आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विमानतळे पूर्णपणे सज्ज असल्याने हे शक्य झाले असल्याचे एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलचे महासंचालक लुईस फिलिप यांनी म्हटले आहे. एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलने २०२१ मध्ये जाहीर केलेल्या जगातील सर्वात व्यस्त विमानतळांच्या यादीत इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ १३ व्या क्रमांकावर होते . २०१९ मध्ये हे विमानतळ १७ व्या क्रमांकावर होते.
अहवालानुसार २०२२ मध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५.९४ कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी ये-जा केली होती. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन भविष्याच्यादृष्टीने विमानतळ सज्ज केले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला या विमानतळाला सर्वोच्च श्रेणीतील सर्वोत्तम विमानतळ म्हणूनही घोषित करण्यात आले होते. आशिया-प्रशांत प्रदेशात सलग पाचव्या वर्षी इंदिरा गांधी आंतरराष्ट्री विमानतळाने दरवर्षी ४० दशलक्ष प्रवाशांचे व्यवस्थापन केले .
हे ही वाचा:
कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरच्या बाहेरील १८५ लोकांनी केली जमीन खरेदी
उत्तरकाशी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली, लोकांचे घाबरून घराबाहेर पलायन
भाजप लक्ष्मणासारखे लोकांचे प्रश्न सोडवतो
हुश्श टेंशन गेलं ईएमआय वाढणार नाही.. रिझर्व्ह बँकेचा व्याज दरवाढीला ब्रेक
डिसेंबरमध्ये आयजीआय विमानतळावर डिजियात्रा हे एप सुरू झाले. पण त्याचा वापर प्रवासी फारसा करताना दिसून येत नाहीत. वापरकर्त्यांची संख्या चार अंकीपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे दोन महिने लागले. यानंतरही वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होण्याचा वेग खूपच कमी होता. दरम्यान, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी लोकांना हे एप वापरण्याचे आवाहन केले, त्यानंतर वेग थोडा वाढला, पण नंतर तो पुन्हा मंदावला. सध्या दररोज सुमारे पाच हजार प्रवासी या एपचा वापर करत आहेत. या विमानतळावर दररोज ८० हजार देशांतर्गत प्रवासी ये-जा करतात. संख्या दररोज 80 हजारांच्या आसपास आहे. यातील जवळपास निम्मे प्रवासी येथून प्रवास करणारे असतात.