29 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरराजकारणमारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा

मारहाण प्रकरणातील महिला गर्भवती नसल्याचा नारायण राणेंचा दावा

डॉक्टरांचे प्रमाणपत्र आपल्याकडे असल्याचे केले वक्तव्य

Google News Follow

Related

ठाणे येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात रोशनी शिंदे या गर्भवती असल्याचा दावा केला जात होता पण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोशनी शिंदे या गर्भवती नसल्याचे सांगितले. तशा प्रकारचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र आपल्याकडे असल्याचे राणे यांनी सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा यापलीकडे उद्धव ठाकरे यांची कोणतीही ओळख नाही आणि तरीही उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना फडतूस म्हणत आहेत, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केला.

ठाणे येथे झालेल्या मारहाण प्रकरणानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर शरसंधान केले.

राणे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना ते फडतूस म्हणत असतील तर ते महाफडतूस आहेत.

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर गुंड राहणार नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणतात पण ती हिंमत दाखवणारे शिवसैनिक राहिलेले नाहीत. एकनाथ शिंदे, नारायण राणे जर तिथे असते तर त्यांनी हिंमत दाखवली असती. पण आता ते होऊ शकत नाही.

हे ही वाचा:

ईडी, सीबीआयचा गैरवापर होत असल्याची विरोधकांची याचिका न्यायालयाने ठरविली ‘फडतूस’

मनीष सिसोदियांचा १७ एप्रिलपर्यंत मुक्काम तुरुंगातच

भेगा असल्या तरी गेटवे ऑफ इंडिया सुस्थितीत

रॅप गाण्यातून मुख्यमंत्र्यांवर बदनामीकारक शब्दप्रयोग करणाऱ्यावर गुन्हा

सामना बंद करा

नारायण राणे यांनी सामना हे वर्तमानपत्र बंद करा अशी मागणी केली. या वर्तमानपत्रात जनहिताचे काय आहे. जी भाषा त्यांनी वापरली आहे ती पाहता हे वर्तमानपत्र चालू राहावे अथवा नाही याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना घ्यावा. मी सामनाची तक्रार करणार असून न्यायालयातही जाणार आहे.

राणे म्हणाले की, सचिन वाझे हा गुन्हेगार होता पण त्याला कामावर घेऊन महत्त्वाचे खाते दिले. सचिन वाझे हे काय उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? गुन्हेगारांना मदत करणारे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रासाठी कलंक आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा