31 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरराजकारणआता सलग पाच दिवस १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस "नैसर्गिक आपत्ती"

आता सलग पाच दिवस १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस “नैसर्गिक आपत्ती”

राज्यातील चिंताग्रस्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा दिलासा. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

Google News Follow

Related

राज्यात सध्या अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मार्च महिन्यात राजच्या अनेक भागात पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. एप्रिल महिना सुरु झाल्यानंतरही महाराष्ट्राच्या काही भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशास्थितीत राज्यातील चिंताग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. राज्यात सततचा पडणारा पाऊस ही आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा महत्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

अतिवृष्टी , अवकाळी किंवा सततचा पाऊस यामुळे अलीकडे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीला तोंड द्यावे लागले आहे. या नुकसानीमध्ये आर्थिक मदत मिळवताना शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. यावर कायममस्वरूपी योजना करण्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारने राज्यात पडणारा सततचा पाऊस ही आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबतीत विस्ताराने सांगितले . मुनगंटीवार म्हणाले, आपत्तीचा कायदा केला त्यामध्ये केंद्राच्या १२ नैसर्गिक संकते, आपत्ती या संदर्भामध्ये केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामध्ये राज्याच्या पाच अशा एकूण १७ नैसर्गिक संकट, आपत्तीचा समावेश करून आपत्ती या संकटात असलेल्या लोकांना मदत करण्यात येते. आता यामध्ये सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सातत्याने जेव्हा पाऊस येतो तेव्हा शेतकऱ्यांचा नुकसान होतं त्यावेळी मदत करण्याची कोणती पद्धत देशांमध्ये नाही. पण आता राज्याने  सततच्या पावसाने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

हे ही वाचा:

धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय असल्याचे सांगून मुनगंटीवार म्हणाले, सध्या ६५ मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला, गारपीट झाली किंवा पाऊस झाला नाही तर मदत केली जाते. मात्र आता सततचा पाऊस याचा नैसर्गिक आपत्तीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग पाच दिवस १० मिली मीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास ती नैसर्गिक आपत्ती समजली जाणार आहे असे मुनगंटीवार म्हणाले. त्यामुळे रोज पाऊस झाला आणि त्यामध्ये सातत्य असेल तर पिकाचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल असेही ते म्हणाले.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय असे :
•शेतक-यांना मदत करण्याकरिता सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून निश्चित
•ग्राहकांना स्वस्त दरात वाळू, रेती उपलब्ध होणार. सुधारित रेती धोरणास मान्यता. रेती लिलाव बंद
• नागपूर मेट्रो रेल टप्पा- २ प्रकल्पास सुधारित मान्यता. ४३.८० किमीचा मेट्रो मार्ग उभारणार
• देवनार डम्पिंग मैदानावर कचऱ्यापासून ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी आरक्षणात फेरबदल
• सेलर इन्स्टीट्यूट “सागर” भारतीय नौदल, मुंबई या संस्थेस नाममात्र दराने भाडेपट्टा नुतनीकरण
• अतिविशेषोपचार विषयातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थी संख्येत वाढ करणार. सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक संवर्गातील १४ पदे निर्माण करणार
• महावितरण कंपनीस कर्ज घेण्यास शासन हमी.
• अकृषि विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा व सातव्या वेतन आयोग लागू करण्यास मान्यता
• नॅक, एनबीए मूल्यांकनासाठी मार्गदर्शन करण्याकरिता परिस स्पर्श योजना

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा