27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामा१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!

१२ लाख डॉलर दंड भरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुटले!

करण्यात आली होती अटक, पुढील सुनावणी डिसेंबरमध्ये होणार

Google News Follow

Related

हेराफेरीच्या आरोपांवरून अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची १.२२ दशलक्ष म्हणजे १२.२ लाख डॉलर इतका दंड भरून सुटका करण्यात आली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुढील वैयक्तिक सुनावणीसाठी ४ डिसेंबर रोजी बोलावले आहे.

अमेरिकेतील पुढील वर्षी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आघाडीचे उमेदवार माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मॅनहॅटन न्यायालयात हजर होण्यापूर्वी मंगळवारी अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

माजी राष्ट्रपतींनी हेराफेरीच्या ३४ प्रकरणांचाही इन्कार केला आहे . आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे. तसेच, युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ट्रम्प यांना सुमारे १.२२ लाख डॉलरचा (१ कोटी १८ हजार १५२ रुपये) दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा:

धोकादायक !! रेसिंगवर पैज लावत होते; ४२ बाईक आणि स्वार ताब्यात

अडीच वर्षांच्या कारभारावरून फडतूस कोण हे लोकांना ठाऊक आहे!

सरकार बदलले, साधू वाचले? पालघरच्या त्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…

मारहाणीचे राजकारण करण्यासाठी ठाण्यात सगळे ठाकरे एकवटले

न्यायालयात सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर ट्रम्प रात्री उशिरा तेथून निघून गेले. ७६ वर्षीय ट्रम्प यांच्यावर गेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प राहण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, शारीरिक संबंधांबद्दल मौन बाळगल्याच्या बदल्यात ट्रम्प यांनी १.३० अब्ज डॉलर (१०,६७० कोटी रुपये) दिले होते असा आरोप पॉर्न स्टारने केला होता.

गडद निळ्या रंगाचा सूट आणि लाल रंगाचा टाय परिधान केलेले ट्रम्प आठ कारच्या ताफ्यासह कोर्टात हजर झाले . तेथे त्यांनी हजारो समर्थकांना हात उंचावून अभिवादन केले. गुन्हेगारी खटल्याचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले माजी अध्यक्ष आहेत. यापूर्वी, ग्रँड ज्युरीने या प्रकरणाच्या तपासात ट्रम्प यांना दोषी ठरवले होते आणि त्यांच्यावर खटला चालवण्यास परवानगी दिली होती.

पक्षातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी ठरलेले ट्रम्प, माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपल्याला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. २०२४ च्या राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकीटाचे प्रबळ दावेदार आहेत.

अटकेच्या आधी पाठवला इमेल

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यायालयात हजर राहण्याच्या काही तास आधी त्यांच्या समर्थकांना ईमेल पाठवला. त्यात त्यांनी म्हटले आहे की अमेरिका हा मार्क्सवादी तिसऱ्या जगातील देश बनत आहे जो मतभेदांना गुन्हेगार ठरवतो आणि आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकतो. ईमेलच्या विषय ओळीत ट्रम्प म्हणाले, “माझ्या अटकेपूर्वीचा माझा शेवटचा ईमेल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा