धावत्या रेल्वेत झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने ट्रेनला आग लावल्याची घटना केरळच्या कोझिकोडनजीक घडली. यात ३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण जखमी झाले आहेत. जखमींना रेल्वे सुरक्षा दलाने (आरफीएफ) रुग्णालयात दाखल केलेय. ही घटना रविवारी २ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमाराला घडली.
यासंदर्भात आरपीएफ आणि रेल्वे प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार अलाप्पुझा-कन्नूर एक्झिटीव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी काही प्रवाशांचा वाद झाला. त्यानंतर एका प्रवाशाने गाडीला आग लावली. या घटनेनंतर कोझीकोड शहरानजीक कोरापुझा रेल्वे पुलावर गाडी पोहचली असता प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली आणि आरपीएफला घटनेची सूचना दिली.
हे ही वाचा:
संजय शिरसाट म्हणतात, अशोक चव्हाण भाजपात जातील!
चौथ्यांदा जीएसटी संकलनाने चौथ्यांदा केला १. ५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार
दादर स्टेशनबाहेरच्या नारळवाल्यांना ‘नारळ’ कोण देणार?
चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य फक्त राऊत यांनाच हवे!
या दरम्यान गाडीला आग लावणारा आरोपी फरार झाला. तर आग लावण्यात आलेल्या बोगीतील एक महिला बेपत्ता असल्याचे लक्षात आले. दरम्यान आरपीएफने रेल्वे ट्रॅकच्या शेजारी शोध घेतला असता सदर महिला, एका बालिका आणि मध्यमवयीन इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेत इतर ९ रेल्वे प्रवासी जखमी झाले असून आरपीएफने रुग्णालयात दाखल केलेय. गाडीला आग लागल्यामुळे या तिघांनी उडी मारली का की आणखी काही कारण होते, याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान आरपीएफ आणि कोझिकोड पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पोलिसांनी फरार आरोपीचे रेखाचित्र तयार केले असून त्याचा शोध जारी आहे.