30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणचोर म्हणण्याचे स्वातंत्र्य फक्त राऊत यांनाच हवे!

चोर म्हणण्याचे स्वातंत्र्य फक्त राऊत यांनाच हवे!

आम्हाला आता देशात कुणाला चोर म्हणण्याचेही स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा कांगावा ते करतात.

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नियमितपणे पल्लेदार वाक्ये फेकत असतात. जणू काही त्या वाक्यांमध्ये तत्त्वज्ञानच सामावलेले आहे. ही वाक्ये फेकण्यामागे त्यांचा एक उद्देश असावा तो म्हणजे कदाचित त्यांची ही वाक्ये इतिहासात नोंदविली जातील.

लोकमान्य टिळकांची काही वाक्ये आजही आपल्या हृदयावर कोरली गेली आहेत. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच किंवा मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही… या बाणेदार वाक्यांप्रमाणे आपलीही वाक्ये लोकप्रिय होतील आणि आगामी पिढ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये ती वाक्ये वाचतील अशी राऊत यांना खात्री असावी. त्यानुसार त्यांनी एक वाक्य आपल्या लेखात नमूद केले ते म्हणजे चोरांना चोर म्हणण्याचे देशात स्वातंत्र्य नाही. ज्या देशात हे स्वातंत्र्य नसते तिथे चोर आणि दरोडेखोरांचे नेतृत्व असते. अशाच भरभक्कम वाक्यांचा रोज मारा करणे ही राऊतांची सवय आहे.

हे ताजे वाक्य राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या निमित्ताने त्यांनी काढलेले आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे सगळेच कसे चोर असतात असे वाक्य उद्गारून पायावर धोंडा मारून घेतला. कर्नाटक येथे २०१९ला झालेल्या विधानसभा प्रचारादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले होते. त्यावरून मोदी समाजाचा अपमान झाल्याचा आरोप करत पूर्णेश मोदी यांनी गुजरातमध्ये एक खटला दाखल केला. त्यात दंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. शिवाय, त्यानंतर ही शिक्षा सुनावल्यामुळे त्यांची खासदारकीही गेली. ती बाब स्वाभाविकच संजय राऊत यांना आवडली नसणार. कारण महाविकास आघाडीच्या नेत्यावर अशी कारवाई केली म्हणजे त्यावर संताप व्यक्त करणे आलेच. तसा संताप मग त्यांनी या उपरोक्त वाक्यातून व्यक्त केला आहे.

हे ही वाचा:

परब फिटनेसच्या निलेश दगडेचे ‘१००’ टक्के यश; मिळविला मुंबई श्री चा मान

…ही कसली वज्रमूठ ही तर वज्रझूठ!

राहुल गांधींनी १० जन्म घेतले तरी ते सावरकरांसारखे होऊ शकणार नाहीत

इटलीमध्ये कार्यालयीन कामकाजात आता इंग्रजी भाषेवर बंदी , नियम मोडल्यास होणार दंड

आम्हाला आता देशात कुणाला चोर म्हणण्याचेही स्वातंत्र्य राहिलेले नाही, असा कांगावा ते करतात. खरे तर, राहुल गांधी कुणालाही चोर म्हणतात, कुणाचाही संबंध कुणाशीही जोडतात, घोटाळा केल्याचे आरोप कुणावरही करतात. त्याला कोणता आधार, पुरावा नसतो. पण त्यांना असे बेलगाम आरोप करण्याची मुभा असली पाहिजे, असे संजय राऊत यांचे म्हणणे असावे. कारण संजय राऊत आणि त्यांचा ठाकरे गट गेल्या काही महिन्यांपासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवर खोक्यांचे, भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. त्यासाठी कोणत्याही पुराव्यांची त्यांना गरज भासलेली नाही. त्यांनी अगदी निवडणूक आयोग आणि शिंदे यांच्यासोबतच्या आमदारांनी २००० कोटींचे डील करून चिन्ह आणि पक्षाचे नाव मिळविले असाही आरोप केला. तेव्हा असे आरोप करण्याची मुभा आपल्याला हवी, असे त्यांचे म्हणणे असते.

आपण सोडून बाकी सगळे चोर आहेत, हे ते सांगू इच्छितात. पण देशात चोर बोलण्याचे स्वातंत्र्य नाही असे म्हणताना, चोरी, करचुकवेगिरी करणाऱ्यांविरोधात होत असलेल्या कारवाईला मात्र त्यांचा विरोध असतो. ईडी, सीबीआय, आयकर खाते यांच्याकडून टाकण्यात येणाऱ्या धाडींबाबत मात्र त्यांचे उलट मत असते. हे सगळे केंद्राच्या दबावाखाली काम करत आहेत, पिंजऱ्यातले पोपट आहेत, केंद्राच्या हातातील बाहुले आहेत असे ते म्हणतात. तेव्हा या सगळ्या तपास यंत्रणा पुराव्याच्या आधारे कशा कारवाई करतात हे राऊत सोयीस्कर विसरतात. कुणी करचुकवेगिरी केली, कुणी दुसऱ्याची संपत्ती हडप केली, कुणी प्रमाणापेक्षा अधिक संपत्ती बाळगली अशा लोकांच्या घरावर जर छापे मारले जात असतील तर त्याचा राग येण्याची राऊत यांना गरज नाही. उलट त्यांनी त्याचे स्वागतच करायला हवे. पण तिथे मात्र त्यांची भूमिका बदलते.

एकीकडे चोरांना चोर म्हणण्याची मुभा द्या असे म्हणायचे पण ईडी, सीबीआयने कारवाई केली की मात्र ही कारवाई दबावतंत्र आहे असे म्हणायचे. यावरून हे स्पष्ट होते की, संजय राऊत यांना जे स्वातंत्र्य हवे आहे ते त्यांच्यापुरते मर्यादित आहे. दुसऱ्यांनी कुणालाही चोर म्हणायचे नाही, त्यांच्यावर कारवाई करायची नाही. चोर बोलण्याचे स्वातंत्र्य हवे ते फक्त आम्हाला दुसऱ्यांना ते नसावे, अशी नव्या लोकशाहीची भाषा ते करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा