30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरक्राईमनामामालवणीत तणावपूर्ण शांतता, पुन्हा गोंधळ, धरपकड सुरु

मालवणीत तणावपूर्ण शांतता, पुन्हा गोंधळ, धरपकड सुरु

मालवणी गोंधळ प्रकरणी २५ जणांना अटक

Google News Follow

Related

मालाड मालवणी भागात गुरुवारी रामनवमी शोभा यात्रेदरम्यान झालेल्या घोषणाबाजी आणि बाचाबाची दरम्यान जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यापूर्वी दगडफेक आणि चप्पल फेकण्याच्या घटनेतही काही जण जखमी झाले होते. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा गोंधळ घालण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी धरपकड सुरु केली आहे. शुक्रवारी सकाळी या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांना अटक केली आहे.

रामनवमी निमित्ताने मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात बजरंग दलाकडून शोभायात्राचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील मालवणी परिसरातील गेट नंबर पाच परिसरात काल राम नवमीनिमित्तची शोभायात्रा जात होती. यादरम्यान, अचानक काही गटांकडून दगडफेक केल्याचा आरोप करत गोंधळ निर्माण झाला. मालवणी येथे दोन गटात आधी शाब्दिक चकमक आणि त्यानंतर भांडणाचं रुपांतर हाणामारीत झालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर येथील तणाव निवळला. मात्र या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

स्थानिक डीसीपी अजय कुमार बन्सल आणि अतिरिक्त सीपी राजीव जैन आधीच घटनास्थळी उपस्थित होते. मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थिती आणखी चिघळण्यापासून रोखली. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हेही रात्री पोलीस ठाण्यात आले. त्यानंतर परिस्थिती निवळली होती . यादरम्यान परीसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर भाजप नेत्यांनी मालवणी पोलिस ठाण्याचा घेराव करून घोषणाबाजी केली. श्रीरामजींचा हा अपमान सहन करणार नाही असे म्हणत लोकांना मोठ्या प्रमाणात जखमा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हे ही वाचा:

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरुवात

पंतप्रधानांनी पाहिले नवे संसदभवन… भव्य, सुसज्ज आणि नव्या रंगरूपात

संभाजीनगर राड्यातील आरोपींचे सीसीटीव्ही फूटेज मिळाले

रामनवमीचा सण देशभरात आनंदाने साजरा

भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी केलेल्या आरोपानुसार, शोभायात्रा दरम्यान काही जणांकडून दगड आणि चप्पल फेक करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारच्या रद्द प्रकरणी मालवणी पोलिसांनी दंगलीच्या कलमाखाली एफआयआर नोंदवला असून आतापर्यंत सुमारे २० जणांना ताब्यात घेतले आहे.मिरवणुकीत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ३० जणांच्या विरोधात अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा