31 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषब्रिटनच्या कोर्टातच खेचतो! ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा

ब्रिटनच्या कोर्टातच खेचतो! ललित मोदींचा राहुल गांधींना इशारा

राहुल गांधींविरोधात अनेक ट्विट करून काँग्रेसचे केले वस्त्रहरण

Google News Follow

Related

आयपीएलचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष ललित मोदी हे गुरुवारी चांगलेच चर्चेत आले. आयपीएलचा सगळा कारभार पाहात असताना ते नियमित चर्चेत असत पण यावेळी वेगळ्या कारणामुळे त्यांचे नाव चर्चेत आले. त्यांनी थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ट्विटची मालिका सुरू केली.

राहुल गांधी यांना २३ मार्चला सूरतच्या न्यायालयाने शिक्षा सुनावली. दोन वर्षांच्या शिक्षेमुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. मोदी या आडनावावरून कर्नाटकमध्ये त्यांनी प्रचारादरम्यान सगळे मोदी कसे काय चोर असतात, असा सवाल उपस्थित केला होता. त्यावरून त्यांच्यावर गुजरातमध्ये खटला दाखल करण्यात आला. त्यावरून ललित मोदी यांनी राहुल गांधींना न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा दिला आहे.

हे ही वाचा:

दिलासा.. दुर्मिळ आजारांवरचा उपचार परवडणार, औषधांवरील सीमाशुल्क रद्द

‘सावरकर गौरव यात्रेला’ जळगावातून सुरवात

छत कोसळून ४० फूट खोल विहिरीत पडले, १३ जणांचा मृत्यू

अमित शहा म्हणाले, मोदींना गोवण्यासाठी सीबीआय तेव्हा माझ्यावर दबाव आणत होती!

ललित मोदी यांनी म्हटले आहे की, मी राहुल गांधी यांना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार आहे. तिथे त्यांना काही ठोस पुरावे घेऊन यावे लागतील, याची मला खात्री आहे. ट्विट करत ललित मोदी यांनी म्हटले आहे की, प्रत्येक टॉम डीक आणि गांधी यांचे प्रत्येक सहकारी एकसारखे म्हणत आहेत की, मी पळपुटा आहे. मग मला सांगावे की, कसे काय आणि मी कधी कुठल्या प्रकरणात दोषी ठरलो आहे?

पप्पू अर्थात राहुल गांधी हे आता एक सर्वसामान्य नागरीक आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना आता काही काम उरलेले नाही. त्यामुळे ते सूडाचे राजकारण करत आहेत. पण मी राहुल गांधी यांना ब्रिटनच्या न्यायालयात खेचणार आहे. तिथे त्यांनी भक्कम पुरावे घेऊन यावेत. राहुल गांधी स्वतःलाच मूर्ख बनवतील याची आता मला प्रतीक्षा आहे. आर. के. धवन, सीताराम केसरी, मोतीलाल व्होरा, सतीश शर्मा हे गांधी कुटुंबाचे बॅग मॅन होते. नारायण दत्त तिवारी यांना विसरता येणार नाही. परदेशात तुमची मालमत्ता कशी काय आहे? कमलनाथ यांना विचारा. हवे तर मी पत्ते आणि फोटो पाठवतो. भारतातील जनतेला फसविण्याचा प्रयत्न करू नका.

गांधी कुटुंबाला तर जणू काही आपणच देशावर राज्य करणार आहोत असा भ्रम आहे. ललित मोदी यांनी म्हटले आहे की, गेल्या १५ वर्षांत मी एक दमडीही घेतल्याचा पुरावा देता आलेला नाही. पण मी ज्या क्रीडाप्रकाराला प्रसिद्धी दिली, त्याची प्रतिष्ठापना केली त्यातून आज १०० अब्ज डॉलरची उलाढाल होते आहे. काँग्रेसच्या एकाही नेत्याने हे विसरू नये की १९५०च्या दशकात मोदी कुटुंबाने काँग्रेससाठी आणि देशासाठी एवढे केले की ते याची कल्पनाही करू शकत नाहीत. त्यामुळे घोटाळ्यांमध्ये आकंठ बुडालेल्या कुत्र्यांनी भुंकत राहावे. सध्या राहुल गांधी यांच्या गेलेल्या खासदारकीवरून काँग्रेसने विविध ठिकाणी आंदोलने घेतली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा