दुर्मिळ रोगांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. केंद्र सरकारने दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या विशेष वैद्यकीय हेतूंसाठी सर्व औषधे आणि खाद्यपदार्थांवर मूलभूत सीमा शुल्कामध्ये मोठी सूट दिली आहे. आयात शुल्कातील सूट १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे.सरकारने विविध प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅबला देखील मूलभूत सीमा शुल्कातून सूट दिली आहे.
औषधांवर सामान्यत: १० टक्के मूलभूत सीमा शुल्क आकारले जाते. काही विशिष्ट श्रेणीतील जीवनरक्षक औषधे, लसींवर ५ टक्के किंवा शून्य सवलतीचा दर आकारण्यात येतो. केंद्र सरकारने राष्ट्रीय धोरण २०२१ अंतर्गत सूचीबद्ध दुर्मिळ आजारांच्या उपचारांसाठी वैयक्तिक वापरासाठी आयात केलेल्या सर्व औषधांवर मूळ आणि विशेष वैद्यकीय हेतूंसाठी अन्न यावर मूळ सीमाशुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे. वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
एनसीबीने केले अंमली पदार्थांचे आंतरराज्यीय जाळे उद्ध्वस्त
मोदी-नेत्यानाहू यांच्यातील फरक राऊतांना कळतो तरी का?
संजय राऊतांना १००० रुपयांचा दंड; आरोप केले पण न्यायालयात हजरच नाही!
आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारत करणार ५,४०० संरक्षण उत्पादनांची खरेदी
या दुर्मिळ आजारांवर उपचार करण्यासाठी लागणारी औषधे किंवा विशेष खाद्यपदार्थ आयात कारवी लागत असल्याने ती महाग आहेत . दहा किलो वजनाच्या मुलांसाठीच्या काही दुर्मिळ आजारांवर उपचारांचा वार्षिक खर्च १० लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकतो, आजीवन उपचार, औषधाची डोस आणि किंमत या स्वरूपानुसार खर्च अवलंबून असते. या सवलतीमुळे खर्चात लक्षणीय बचत होईल आणि रुग्णांना दिलासा मिळेल असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
असा मिळेल सवलतीचा लाभ
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी, वैयक्तिक आयातदाराला केंद्रीय किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा किंवा जिल्ह्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. तर, स्पाइनल मस्क्युलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीच्या उपचारांसाठी निर्दिष्ट केलेल्या औषधांना आधीच सूट देण्यात आली आहे.