25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरदेश दुनियाराष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना दिलासा नाहीच

राष्ट्रगीत अवमान प्रकरणी ममता बॅनर्जींना दिलासा नाहीच

मुंबई उच्च न्यायालयाने ममता बॅनर्जी यांचा अर्ज फेटाळला

Google News Follow

Related

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणाऱ्या तक्रारीत त्यांना कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला आहे.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी ममता यांच्याविरोधात कनिष्ठ न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. मुंबई भाजपचे सरचिटणीस विवेकानंद गुप्ता यांनी ममता बॅनर्जी यांच्याविरोधात महानगर दंडाधिकारी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या तक्रारीवर न्यायालयाने मार्च २०२२ मध्ये ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी डिसेंबर २०२१मध्ये मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहात एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीत सुरू झाले. त्यावेळी व्यसपीठावरील सर्व मान्यवर राष्ट्रगीत सुरु होताच उठून उभे राहिले. पण ममता बॅनर्जी उभ्या राहण्याऐवजी बसून राहिल्या. त्यानंतर मध्येच ममता बॅनर्जी अचानक उभ्या राहिल्या आणि दोन ओळी गाऊन पुन्हा अचानक निघून गेल्या. या प्रकरणी मुंबई भाजपचे पदाधिकारी विवेकानंद गुप्ता यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असल्याची तक्रार मुंबईच्या माझगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी या समन्सला विशेष न्यायालयात आव्हान दिले होते.

हे ही वाचा:

करमुसे प्रकरणातील आरोपी आणि जितेंद्र आव्हाडांचे माजी अंगरक्षक वैभव कदम यांची आत्महत्या

गुगल, मायक्रोसॉफ्टला टक्कर .. लवकरच येतोय भारतीय बनावटीचा चॅटजीपीटी

युपीआयवर आता २ हजारांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क

मी आता डॉक्टर झालेलो नाही, याआधीही छोटी-मोठी ऑपरेशन केलीत!

ममता बॅनर्जी यांच्या कृतीमुळे राष्ट्रगीताचा अनादर झाला आहे. १९७१च्या राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायद्यानुसार हा गुन्हा आहे असल्याचा दावा गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत केला होता . त्यांनी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्यांनी महानगर दंडाधिकारी न्यायालयात धाव घेतली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा