24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणभाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

भाजपा शिवसेना युतीचे नेते म्हणत आहेत ‘मी सावरकर, आम्ही सावरकर’

राहुल गांधी, काँग्रेस तसेच ठाकरे गटाला कोंडीत पकडण्याची मोहीम, सगळ्यांचे प्रोफाइल बदलले

Google News Follow

Related

सध्या एकूणच देशभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या अपमानावरून रणकंदन माजले आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या अवमानजनक टिप्पणीनंतर राजकारण तापले असून आता महाराष्ट्रातील भाजपा शिवसेना युतीच्या नेत्यांनी आपले सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलून मी सावरकर किंवा आम्ही सावरकर असे ठेवले आहे.

त्यामुळे आता विरोधी पक्षातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात किंवा काय पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर आम्ही सावरकर असे प्रोफाईल बदलले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी सावरकर असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चित्र असलेले प्रोफाइल बदलले आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही आपले प्रोफाइल बदलून ‘मी सावरकर’ असे लिहिलेला स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो तिथे घेतला आहे.

हे ही वाचा:

सावरकरवादी नाही, तेव्हा ठाकरे अजमेरावादी होते!

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, पुढील ३० दिवस होणार १५ % पाणीकपात

टोइंग करताना पोलिसालाच पोलिसांचे बनावट ओळखपत्र दाखवले; मग सापडले जाळ्यात

हुश्श…आता ३० जूनपर्यंत करा पॅन आधारशी लिंक

त्यामुळे एकूणच राहुल गांधी आणि काँग्रेसची या प्रकरणात कोंडी करण्याची योजना भाजपा शिवसेना युतीने आखली आहे. महाराष्ट्रातील भाजपा तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते यांनीही आपले प्रोफाइल बदलले आहेत तसेच सावरकर प्रेमींनीही आपापल्या प्रोफाइलवर सावरकरांचा फोटो ठेवला आहे. एकूणच महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्याकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या अपमानामुळे हे सगळे सावरकरप्रेमी नाराज झाले आहेत. त्यातूनच ही मोहीम राबविली जात आहे.

राहुल गांधी यांची खासदारकी गेल्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी कधी माफी मागत नाही असे म्हटले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनीही सावरकर हे माफीवीर नव्हते असे विधान करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तर मालेगावमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. पण आता ठाकरे गट या नव्या मोहिमेत सामील होतो का, सावरकरांचे फोटो त्यांच्या सोशल मीडियावरील प्रोफाइलमध्ये दिसतात का, हे पाहायचे आहे. एकूणच काँग्रेससह ठाकरे गटाचीही कोंडी या मोहिमेमुळे होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा