31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामामंत्रालयासमोर करण्यात आलेल्या विषप्राशनाचे वास्तव आले समोर

मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या विषप्राशनाचे वास्तव आले समोर

विषप्राशन का केले याचा शोध जारी, एका समाजसेवकाला हुडकून काढण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

मंत्रालयासमोर दोन महिलांनी विषप्राशन करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यासंदर्भातील वास्तव समोर आले आहे.

शीतल गादेकर (धुळे) आणि संगीता डावरे (नवी मुंबई) अशा दोन महिला काल मंत्रालयासमोर आल्या होत्या आणि त्यांनी विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना तत्काळ थांबविले. पण, काही प्रमाणात त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. त्यामुळे त्यांना तत्काळ जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

चेहर्‍याला मास्क लावून आणि टॅक्सीत बसून त्या दोघी मंत्रालयात आल्या होत्या. दोघीही वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तरीही त्या एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. संगीता डावरे या नवी मुंबईतून एका पोलिस कॉन्स्टेबलच्या पत्नी आहेत. सदर पोलिस कॉन्स्टेबलचा पाय एका शस्त्रक्रियेदरम्यान निकामी झाला. त्या डॉक्टरविरुद्ध फौजदारी कारवाई करावी, अशी त्याची मागणी होती.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना काढले महाविकास आघाडीतून ‘बाहेर’

ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांसाठी रद्द

बिग बँग थिअरीमध्ये माधुरी दीक्षितबद्दल आक्षेपार्ह भाषा, रागावलेल्या चाहत्याने उचलले हे पाऊल

ठाकरे, पवार यांनी राहुल गांधींकडून माफी वदवून घ्यावी

 

शीतल गादेकर या धुळ्यातील असून, त्यांच्या पतीच्या निधनानंतर, पतीच्या मित्राने जमीन बळकावली, याबाबत कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. (आज त्यांचा मृत्यू झाला.) दरम्यान, या दोन्ही महिला वेगवेगळ्या असताना एकाच कथित समाजसेवकाच्या संपर्कात होत्या. त्यानेच या दोन्ही महिलांना त्या व्यक्तीने मंत्रालयासमोर जाऊन विषप्राशन करा, असे सांगितले. पोलिस या कथित समाजसेवकाबद्दल अधिक माहिती घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा