24 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरक्राईमनामासात खुनांसाठी फाशी ठोठावलेला अल्पवयीन अखेर २८ वर्षानंतर तुरुंगाबाहेर

सात खुनांसाठी फाशी ठोठावलेला अल्पवयीन अखेर २८ वर्षानंतर तुरुंगाबाहेर

नारायण याने आपल्या आणखी दोन साथीदारांसह पुणे येथे पाच महिला आणि दोन मुलांची हत्या केली होती.

Google News Follow

Related

गुन्हा केला त्यावेळी अल्पवयीन असलेल्या एका आरोपीला पुढे फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता त्याला सोडून देण्याचे आदेश दिले आहेत. तब्बल २८ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर आता तो आरोपी तुरुंगाबाहेर पडणार आहे.

तो आरोपी नारायण चेतनराम चौधरी आहे. गेली २८ वर्षे त्याने तुरुंगात खितपत काढली. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के.एम. जोसेफ, न्या. अनिरुद्ध बोस आणि न्या. हृषिकेश रॉय यांनी त्याची सुटका केली आहे. अल्पवयीन आरोपीसंदर्भात असलेल्या कायद्यानुसार (care and protection of children act 2015) एखाद्याला फाशीची शिक्षा देण्यात येऊ शकत नाही तर त्याला कमाल तीन वर्षांचीच शिक्षा होऊ शकते.

हे ही वाचा:

…आणि तो ठरला खलिस्तानचा ‘वारिस’

कुख्यात डॉन अतिक अहमदला जन्मठेप

शरद पवार म्हणतात, सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही!

बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन 

नारायण याने आपल्या आणखी दोन साथीदारांसह पुणे येथे पाच महिला आणि दोन मुलांची हत्या केली होती. त्यानंतर त्याला १९९४ ला अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगात होता. त्याला १९९८मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयाने त्याच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम केली होती. त्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका करण्यात आली. ती नंतर फेटाळण्यात आली. पुढे अल्पवयीन न्याय कायदा २०१५च्या ९ (२) कलमानुसार याचिका करण्यात आली. त्यात जेव्हा गुन्हा घडला तेव्हा तो अल्पवयीन होता असा दावा करण्यात आला.

२०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील सत्र न्यायालयाला आदेश दिले की, त्यांनी या याचिकादाराचे वय तपासावे आणि त्याचा अहवाल सादर करावा. नंतर या न्यायालयाने अहवाल सादर केल्यावर नारायण चौधरी हा अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. जेव्हा गुन्हा दाखल झाला तेव्हा आरोपपत्रात त्याचे वय २० वर्षे दाखविण्यात आले होते. नारायणचा जन्म १ फेब्रुवारी १९८२ला झाला होता. त्यामुळे गुन्हा घडला तेव्हा तो १२ वर्षे आणि ६ महिन्यांचा होता. वयासंदर्भातील विविध कागदपत्रांतही घोळ असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्याचे नाव जन्मतारखेच्या दाखल्यावर निरणराम असे लिहिले होते. पण त्याच्या वडिलांचे नाव मात्र चेतनराम असेच लिहिलेले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा