25 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारणसावरकरांच्या अपमानाच्या निषेधार्थ राज्यभर, जिल्ह्याजिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा...

सावरकरांच्या अपमानाच्या निषेधार्थ राज्यभर, जिल्ह्याजिल्ह्यात सावरकर गौरव यात्रा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आवाहन

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वारंवार होणाऱ्या अपमानाविरोधात भाजपा शिवसेना युतीतर्फे संपूर्ण राज्यात एक मोहीम राबविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत या मोहिमेची घोषणा करण्यात आली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून सावरकरांच्या होत असलेल्या अपमानाचा तीव्र शब्दांत निषेध करत ही मोहीम जाहीर करण्यात आली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले की, राहुल गांधींकडून सावरकरांचा वारंवार अपमान होत आहे. याचा निषेध करावा तेवढा थोडा. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे आंदोलन करत असताना काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांच्या त्यागातून स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणूनच आपण मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत. राहुल गांधी यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या अवमानाच्या निषेधार्थ आम्ही राज्यात, जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्या तालुक्यात सावरकर गौरव यात्रांचे आयोजन करणार आहोत.

हे ही वाचा:

परशुराम घाट ३ एप्रिलपर्यंत बंद; सहा तास वाहतूक नाही

खलिस्तानी चळवळीचा नवा चेहरा अमृतपाल…

विजय बजरंग, जागृती, पंचगंगा, श्री साई यांनी दिली विजयी सलामी

पोलिस अधिकारी कृष्णप्रकाश गेटवे ते एलिफन्टा लाटांवर झाले स्वार

शिंदे म्हणाले, देशात लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपल्या पद्धतीने वावरण्याचा अधिकार मिळाला. पण देशभक्तांनी, स्वातंत्र्यसैनिकांनी जे बलिदान दिले त्यांचा अवमान करण्याचे निंदनीय प्रकार जाणीपूर्वक केला जातो त्याचा निषेध देशभरात होतो आहे. खरे म्हणजे हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत,  राहुल गांधीही उपभोगत आहेत. ते सेल्युलर जेलमध्ये एकदिवस जरी राहिले तरी त्यांना त्यागाची जाणीव होईल. पण अपेक्षा किती करणार. ती रोज सांगत आहेत की, मी सावरकर नाही गांधी आहे. खरे तर, सावरकर होण्याची तुमची लायकी नाही. त्यांचा त्याग तुमच्यात नाही. तुम्ही कसले सावरकर होणार?

शिंदे यांनी राहुल गांधींवर घणाघात केला. ते म्हणाले की, देशाबद्दल प्रेम असले पाहिजे. देशाची निंदा परदेशात जाऊन करता हे देशाचे दुर्दैव. लोकशाहीच्या बाबत बोलता. एकमेकांवर आरोप करणे समजू शकते. पण देशाची बदनामी परदेशात जाऊन करता त्याची निंदा करावी तेवढी थोडे. एकप्रकारे देशद्रोहच. पुन्हा एकदा या सावरकरांच्या अपमान करणाऱ्या वृत्तीचा निषेध करतो. जाहीर निंदाही करतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा