अंधेरीतल्या साकीनाका भागात लागलेल्या आगीत दोन दुकाने भस्मसात झाली आहेत. सोमवारी सकाळी ही आग लागली आहे. ही आग साकीनाका मेट्रो स्टेशनमधील इलेक्ट्रिक आणि हार्डवेअरच्या दुकानात आग लागली आह . या आगीत राकेश गुप्ता हा २२ वर्षांचा तरुण भाजला. या तरुणाला तातडीने राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने गुप्ता याला मृत घोषित केले आहे.
स्किनकामध्ये राजश्री हार्डवेअर हे दुकान आहे. या दुकानातील ४०x५० फूट परिसरात इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स, हार्डवेअरचा मोठा साठा ठेवण्या आला होता. दुकानाला पहाटे तीनच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सगळीकडे धुराचे लोळ दिसत होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. दुकानातील हार्डवेअरच्या मोठा साठा असल्याने अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत होती. तळ अधिक दुसरा मजला असलेल्या या इमारतीमधील लॉफ्ट पडल्यामुळेही अग्निशमन दलाला अडचणी येत होत्या. जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा पुढील भाग पाडण्याचे काम सुरू आहे आगीत २ ते ३ जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
कॅलिफोर्नियाच्या गुरुद्वारात झाडल्या गोळ्या, २ जण जखमी
तीन-चार वर्षात देशात उभारली जातायेत ‘इतकी’ विमानतळे
परिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!
अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नानंतर अर्धा तासात आग आटोक्यात आणली. पण त्यानंतर साधारण पाच वाजता पुन्हा आग भडकण्याचा प्रकार घडला.अग्निशमन दलाच्या ८ ते १० बांबानी ही आग आटोक्यात आणली. मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 असल्याचे म्हटले आहे. आगीमध्ये दुकानांचे पूर्ण नुकसान झाले आहे. आगीच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.