22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरक्राईमनामाखतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

खतरनाक आरोपी अतिकला उत्तर प्रदेशला नेणार; उमेश पाल हत्याकांड

साबरमती तुरुंगात पोचले पोलीस

Google News Follow

Related

उत्तर प्रदेश पोलिसांनी गँगस्टर अतिक अहमद याला गुजरातच्या तुरुंगातून उत्तर प्रदेश येथे आणायची तयारी सुरु केली असून, आज उत्तर प्रदेश पोलीस हे अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात पोचले आहेत. प्रयागराज मध्ये उमेश पाल हत्याकांड प्रकरणी ते अतिकची चौकशी करत आहेत.

चौकशी झाल्यावर अतिकला ट्रान्सफर वॉरंटवर उत्तर प्रदेशात नेले जाणार असल्याचे बोलले जाते आहे. अतिकला २०१९ मध्ये साबरमती तुरुंगात शिफ्ट करण्यात आले होते. २२ एप्रिल २०१९ मध्ये अतिकला सुप्रीम कोर्टाने देवरिया तुरुंगातून गुजरातच्या उच्च सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या तुरुंगात हलवण्याचे आदेश दिले होते. रिअल इस्टेट उद्योजक मोहित जयस्वाल याचे अपहरण आणि हत्येचा कट रचल्याचा अतिकवर आरोप करण्यात आला आहे.

२४ फेब्रुवारीला प्रयागराज येथे उमेश पाल यांची हत्या करण्यात आली. या आरोपींमध्ये गँगस्टर अतिकचा मुलगा असद आणि त्याचे शार्प शुटर अजूनसुद्धा फरार आहेत. या आरोपींनी उमेश पाल याची गाडीतून उतरल्यावर लगेच गोळ्या घालून हत्या केली होती. आणि बॉम्बस्फोट सुद्धा घडवून आणला होता या हल्ल्यामध्ये उमेशसह त्याच्या दोन साथीदारांचा मृत्यू झाला होता. ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून माजी आमदार राजू पाल यांच्या हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होता. उमेश पाल याची पत्नी जया पाल यांनी अतिक अहमदसोबत अशरफ, त्याची पत्नी शाईस्ता परवीन, त्यांची दोन्हीं मुले, आणि अन्य ओरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी शूटर्स हे बांग्लादेशात पलायन केल्याचे सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरे हे खरे दरोडेखोर!

प्रियांका गांधींनी केले परिवारवादाचे समर्थन; म्हणाल्या, श्रीराम, पांडवही परिवारासाठीच लढत होते!

वैभव मांगले म्हणतोय ‘भय इथले संपत नाही!’

कॅगचा अहवाल आला; महापालिकेवर दरोडा टाकणाऱ्यांचा बुरखा फाटणार

त्यामुळे पोलिसांनी आता आखाती देशातून येणाऱ्या फोन कॉल्स वर लक्ष ठेवले होते. अतिक अहमदचे शूटर्स हे व्हॉइस ओव्हर ईंटरनेट प्रोटोकॅल च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. म्हणूनच तपास यंत्रणा जास्त सतर्क झाल्याचे काळात आहे. याशिवाय आखाती देशात बोलण्याकरता अवैधपणे टेलीफोन एक्सचेंज चालवणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. अतिक अहमदला गुजरातच्या साबरमती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पण प्रयागराजमध्ये नुकत्याच झालेल्या उमेश पाल हत्येमुळे तो परत एकदा चर्चेत आला आहे. माजी आमदार राजू पाल यांच्या हत्येतील उमेश हा मुख्य साक्षीदार होता तर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ हे दोघे आरोपी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा