25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरदेश दुनियासॅन फ्रन्सिस्कोमध्ये खलिस्तानी समर्थकांसमोर उभे ठाकले भारतीय: एकजुटीचे दर्शन

सॅन फ्रन्सिस्कोमध्ये खलिस्तानी समर्थकांसमोर उभे ठाकले भारतीय: एकजुटीचे दर्शन

वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा देत खलिस्तानी समर्थकांना दिले उत्तर, त्यांच्यावर कारवाई करण्याची सॅन फ्रॅन्सिस्को सरकारकडे केली मागणी

Google News Follow

Related

गेल्या आठवड्यात सॅन फ्रॅन्सिस्को येथील भारतीय दूतावासावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी तेथील अनिवासी भारतीयांनी एकत्र येत या हल्ल्याचा निषेध केलाच शिवाय वंदे मातरमच्या घोषणा देत आपल्या एकजुटीचे प्रदर्शन केले.

याठिकाणी जवळपास १०० पेक्षा अधिक लोक जमा झाले होते. त्यात विविध धर्मियांचा समावेश होता. या सगळ्यांनी अमेरिकेचा झेंडा तसेच भारतीय तिरंगा उंचावत एकजुटीचे दर्शन घडविले. वंदे मातरम आणि भारत माता की जयचे नारेही या सगळ्यांना लगावले.

हे ही वाचा:

पृथ्वी जवळून जाणार एक लघुग्रह

खुष खबर…केंद्रीय कर्मचारी, पेन्शनधारकांच्या डीएमध्ये झाली इतकी घसघशीतवाढ 

पहिल्या महिला तिकीट तपासनीसचे कौतुक

जीएसटीशी संबंधित वाद आता झटपट सुटणार

तिथे खलिस्तानी समर्थकही आपल्या झेंड्यासह आले होते पण त्यांच्यासमोर नाचून, घोषणा देऊन त्यांनी खलिस्तानी समर्थकांना चोख उत्तर दिले. त्यावेळी दोन गटात शाब्दिक चकमकही झाली. गेले पाच दिवस हे खलिस्तानी समर्थक त्यांचा तथाकथित नेता अमृतपालसाठी दूतावासासमोर येऊन निदर्शने करत आहेत. शनिवारीही असेच हे समर्थक निदर्शने करण्यासाठी तिथे जमले होते तेव्हा भारतीयांनी त्यांना उत्तर देण्यासाठी तिथे एकत्र येत घोषणाबाजी केली. अमेरिकेच्या निवडणुकीती उमेदवार रितेश टंडन यांनी सांगितले की, आम्ही शीख समाजाचे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि या ठिकाणी सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन एकजुटीचे दर्शन घडविले त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आहे. दूतावासावर केलेल्या हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला तसेच सॅन फ्रॅन्सिस्कोच्या पोलिसांना दूतावासाला संरक्षण पुरविण्यात अपयश आले. सॅन फ्रॅन्सिस्को सरकार इथे सुरक्षा पुरवू शकले नाही हे वाईट आहे. शिवाय, त्यांनी खलिस्तानी समर्थकांना इथे निदर्शने करण्याची मात्र मुभा दिली. महत्त्वाचे म्हणजे खलिस्तानी समर्थकांनी इथे गोंधळ घातला तरी त्यांना कुणीही अटक केली नाही. त्यामुळे या खलिस्ताननींच्या हल्ल्याची चौकशी व्हायला हवी. अमेरिकेतील विदेशी राजदूतांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावीच लागेल.

याआधी, लंडनमध्येही खलिस्तानी चळवळीच्या समर्थकांनी दूतावासावर हल्ला केला होता. तिथेही पोलिसांनी कोणत्याही प्रकारचे संरक्षण दिले नाही. नंतर भारतातील ब्रिटिश दुतावासाबाहेरील सुरक्षा कमी करण्यात आल्यावर ब्रिटनचे डोळे उघडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा