जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन झालेले अजय बंगा हे सध्या जागतिक दौऱ्यावर आहेत. अजय बंगा हे त्यांच्या जगाच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर भारतात पोहोचले आहेत. २३ आणि २४ मार्च असा हा त्यांचा दोन दिवसांचा दौरा आहे. दिल्लीत पोहचल्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या नियमित चाचणीदरम्यान बंगा हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . सध्या ते आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती अमेरिकेच्या अर्थ विभागाने दिली आहे.
गेल्या दोन आठवड्यांत भारतात इन्फ्लूएंझा आणि कोविड च्या प्रकरणांमध्ये वाढ होतांना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात १,१३४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या ७,०२६ वर गेली आहे. अजय बंगा यांनी आफ्रिकेतून सुरू झाला, त्यानंतर युरोप, लॅटिन अमेरिका आणि आशियातील देशांमार्गे अजय बँगा भारतात आले आहेत. भारतात आल्यानंतर बंगा हे कॉरोन पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.
अजय बंगा नियमित चाचणी दरम्यान कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण त्यांच्यामध्ये अद्याप कोरोनाची लक्षणे दिसून आणलेली नाहीत. स्थानिक मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे असं अमेरिकेच्या ट्रेझरी खात्याने म्हटले आहे. आपल्या भारत दौऱ्यात बंगा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा:
अमृतपाल सिंहचे काय झाले? न्यायालयालाही पडलाय प्रश्न…
आशियातील सर्वात मोठी दुर्बीण उत्तराखंडमध्ये
आज हुतात्मा दिन! याच दिवशी दिली होती भगत, सिंह, राजगुरू, सुखदेव या क्रांतीकारकांना फाशी
कोरोना झाल्यानंतर अजय बंगा यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबतची त्यांची बैठक रद्द करण्यात आली आहे . बंगा यांनी कोणत्याही भारतीय समकक्षांशी भेट घेतलेली नाही. स्थानिक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आयसोलेशनमध्ये आहेत असे नवी दिल्लीतील अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.